नारी शक्ति योजना ऑनलाइन अप्लाई | नारीशक्ति दूत app लिंक लाडकी बहिन योजना

लाडकी बहिण योजना ऑनलाइन  Nari Shakti Doot App अर्ज कसा करायचा

 लाडकी बहीण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला नारी शक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावा लागेल.

नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड केल्यावर आपल्याला तिथे आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करायचं आहे.

मोबाईल नंबर ओटीपी व्हेरिफाय केल्यावर तिथे आपलं संपूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा आणि नारीशक्तीच्या प्रकार सिलेक्ट करायचे आहे.

 महिलेची संपूर्ण नाव व तिचे वडिलांचे/ पतीचं नाव, जन्मदिनांक, पूर्ण पत्ता, जन्मदिनांक, मोबाईल नंबर  या सर्व बाबी भरायचे आहे.

 त्यानंतर  बँकेची सर्व डिटेल्स व कागदपत्रे अपलोड करायची आहे, तुम्हाला आपल्या मोबाईल फोनचे लोकेशन ऑन करायचे आहे.

 बँक डिटेल्स व कागदपत्र अपलोड करून झाल्यावर महिला अर्जदाराची फोटो काढून हमीपत्र वर टिक करून सर्व माहिती जतन करायची आहे.

 फॉर्म योग्य रित्या भरला आहे की नाही याची पडताळणी झाल्यावर फॉर्म सबमिट करायचा.

अशाप्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरल्याने झी लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपये प्रति महिना लागू होईल.