Ladki Bahin Yojana HamiPatra PDF | लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र कसा भरायचा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Hamipatra Kase Banvayche

Ladki Bahin Yojana HamiPatra PDF : महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या शासनाचा ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलां लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
लाडकी बहीण योजना यामध्ये ऑनलाईन अर्ज सोबत सर्व पात्र महिलांना हमीपत्र पण द्यायचा आहे त्यासाठी हमी पत्र कुठून आणायचे, हमीपत्र कुठून डाऊनलोड करायचे याबद्दल महिलांमध्ये मनामध्ये शंका आहे, या पोस्टमध्ये आपण सर्व शंकांचे दूर करणार आहोत.

लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र कसं भरायचा| Ladki Bahini Yojana Hamipatra Kase Bharayche Online

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना साठी लागणारे आम्ही पत्रामध्ये ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF) आपल्याला सर्वप्रथम अर्जाचे हमीपत्र असे सर्वत वर लिहिलेले दिसेल.
त्याच्या खाली आपल्याला लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने घातलेल्या सर्व अटी शर्तीचे बंधनकारक अशा सर्व शर्ती लिहिलेल्या दिसेल.
त्या अटी शर्ती च्या समोर आपल्याला राईट असे खून करायची आहे आणि सगळ्यात खाली आपल्याला आपलं नाव आणि सही करून त्याचे फोटो काढून आपल्याला अर्जं भरायच्या वेळी तिथे हमी पत्र अपलोड करायच्या आहेत.
लाडकी बहीण योजनातील हमीपत्र अटी शर्थी खालील प्रमाणे आहे.

Ladki Bahini Yojana Hamipatra Marathi

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना अर्जदाराचे हमीपत्र

मी घोषण करते की, (  ✔अशी खूण करा)

  1. मी घोषित करते की, (  ✔ अशी खूण करा)
  2. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
  3. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
    माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  4. मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार
  5. किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
  6. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार /कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रु.2.50 लाख
    पेक्षा कमी आहे.
  7. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रु.1,500/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक
    योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  8. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नाही.
  9. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बो्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/
    संचालक/सदस्य नाहीत.
  10. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  11. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  12. मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल []पवर आधार क्रमांक आधारित
  13. प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वत:ला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक
    किंवा वन टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की,
    “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु
  14. शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माज्ञे
  15. आधार ई-केवायसी (E-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.

स्थळ-
दिनांक-

नोट-

(अर्जदाराची सही व नाव)

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ठ झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना अर्ज अर्जदाराचे हमीपत्र

ladki bahini yojana hamipatra kase banvayche
क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र



लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana HamiPatra PDF | लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र कसा भरायचा”

Leave a Comment