Ladki Bahin Yojana Jully Installment 1500/3000 Rupaye Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचे 17 दिवस झाले असून सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चा हप्त्याची वाट पाहत आहेत.
लाडकी बहीण योजनांमध्ये काही महिन्यापासून चालू महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये वर्ग केला जात आहे त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता आगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत यायला पाहिजे होता परंतु अजूनही याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आपण यामध्ये पाहूया की जुलै महिन्याचा हप्ता 1500 मिळणार का 3000 रुपये मिळणार कारण पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय सण म्हणजे रक्षाबंधन आहे. राज्य सरकार रक्षाबंधनाच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार काय म्हणजेच 3000 रुपये देणार का याबद्दल आपण सविस्तर पाहूया. Ladki Bahin Yojana Jully Installment 1500/3000 Rupaye Update

जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता होती कारण 12 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी 319 कोटी रुपये विभागाकडे प्राप्त झाले आणि हा जीआर प्रसारित होऊन सात दिवस ओलांडून सुद्धा अजूनही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला संभ्रमात आहेत की जुलै महिन्याचे पंधराशे मिळतील का तीन हजार रुपये मिळतील. जर पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 24, 25 ऑगस्ट रोजी जर आता वितरण झाले तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी लाडक्या बहिणीला मिळू शकते. नाहीतर जुलै महिन्याचे 1500 रुपये पुढील दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.

या महिलांना मिळणार 3000 रुपये
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना मागील महिन्याचा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना जुन आणि जुलै महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळतील.
मागील काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील तब्बल 92 लाख महिला ह्या विविध कारणामुळे अपात्र करण्यात आल्या होत्या त्यामधील ज्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि त्या महिला पात्र असतील त्या महिलांना हप्ता मिळू शकतो म्हणजेच एकत्रितपणे हप्ते मिळतील आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही अशा महिलांना या योजनेतून बात करण्यात आलेले आहे.

अपात्र होण्याची कारणे
लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाभार्थी महिलांची संख्या ही फक्त 1 कोटी 66 लाख एवढीच राहिलेली आहे त्यामध्ये सर्व महिला ह्या पात्र असून त्या सर्व महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा पण झालेले आहेत.
लाडकी बहिण योजनेमध्ये जवळपास 80 लाख महिला अपात्र झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने कारणे लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्या अपात्र झालेले आहेत तसेच अनेक महिलांच्या घरी चार चाकी वाहने किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत. अनेक महिला अशा आहेत की त्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.