Ladki Bahin Yojana e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना, या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन दिले जाते.लाडकी बहिण योजने बद्दल आता मोठी अपडेट समोर आलेली आहे.
लाडकी बहिण योजनेत आता सर्व पात्र लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे यासाठी शासनाने शासननिर्णय जाहीर केलेला आहे तर बघूया लाडकी बहीण योजनेत केवायसी कशी करायची या कधी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती.
लाडकी बहीण योजनेत e-KYC का आवश्यक आहे?

सक्तीचे आणि पारदर्शक: योजनेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने e-KYC सक्तीचे केले आहे.
पुढील लाभांसाठी उपयुक्त: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार, ही प्रक्रिया भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
Ladki Bahin Yojana e-KYC न केल्यास काय होईल?
जर तुम्ही वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला मिळणारे ₹1500 मानधन रोखले जाईल आणि तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल. यामुळे वेळेत e-KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शासन निर्णयात (GR) काय म्हटले आहे?
महिला व बाल विकास विभागाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, e-KYC संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- योजनेचे नाव: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना.
- उद्देश: राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी.
- प्रक्रिया: या योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) द्वारे केले जाईल.
- आधार प्रमाणीकरण: e-KYC प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) वापरणे बंधनकारक आहे.
- वेब पोर्टल: या योजनेसाठी खास तयार करण्यात आलेले वेब पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in आहे, जिथे e-KYC ची सुविधा उपलब्ध आहे.
- अंतिम मुदत: या शासन परिपत्रकाच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे असे करणार नाहीत, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पात्र मानले जाणार नाही.
- वार्षिक प्रक्रिया: या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील.
Ladki Bahin Yojana e-KYC कसे करायचे?

ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्हाला फक्त खालील पायऱ्या फॉलो करायच्या आहेत:
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (eKYC) कशी करावी (मोबाईलवरून) Ladki Bahin Yojana ekyc Online Mobile
- ई-केवायसी सुरू करण्याची प्रक्रिया:
तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून ladkibahine.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर Website दिसणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार क्रमांक टाका:
नवीन पेजवर, ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक Aadhar Card Number टाका.
दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि “मी सहमत आहे” या पर्यायावर टिक करा.”ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.
- ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन:
लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक aadhar card link असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल .
तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक:

आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल, तर पतीचा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा Captcha भरा, “मी सहमत आहे” वर टिक करा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा..
पती किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी OTP Submit टाकून सबमिट करा.
(टीप: ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पर्याय आल्यास आपल्याला माहीत उपलब्ध करून देण्यात येणार)
- जातीचा प्रवर्ग निवडा:
आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (कॅटेगरी) निवडायचा आहे, जसे की SC, ST, OBC, VJ (A), NT (B), NT (C), NT (D), SBC किंवा Open/General.
- डिक्लेरेशन (घोषणा) आणि माहितीची पडताळणी:
पहिला प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत.” या प्रश्नासाठी तुम्हाला ‘होय’ YES निवडायचे आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे.
दुसरा प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” हे एक डिक्लेरेशन Declaration आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा ‘होय’ YES निवडायचे आहे.
दोन्ही ठिकाण ‘होय’ YES निवडल्यानंतर, दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल, यावर टिक करून “सबमिट करा” Submit बटणावर क्लिक करा.
- ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण:
“तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल, याचा अर्थ तुमची केवायसी झाली आहे.

लाडकी बहीण योग्य केवायसी नाही केलं तर काय होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या तुम्हाला मिळणारा लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये सन्मान निधी शासनातर्फे रोखला जाईल व तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार.
काय म्हणाल्या मंत्री अदिती ताई तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Nari shakti Doot Madhun From Bharla Hota Tyani E kyc Kashi Karychi ?
Otp येतो पण otp चे स्क्रीन नाही येत, खुप try केले
Kyc
Mukkam post Taluka Jila Pune
Kyc kese kare
Kyc
वडील आणि पती दोन्ही ही नाहीत किंवा हयात नाहीत… तर मग इ केवायसी करताना काय करायचे? वडील आणि पती दोन्ही ही हयात नसताना त्यांचे मोबाईल नंबर कुठून आणणार…otp च प्रॉब्लेम येत आहे… काही तरी यावर उपाय काढावा कृपया
Ho Nakki
Please paise ajun September October November December January nahi aale hai sir
Ekyc form completed jhali hai
Please 🙏 Sir