Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणार 40 हजारांपर्यंत लोन !! प्रक्रिया जाणून घ्या

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Loan Amount for 40000 Rupaye Update

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये महिला आणि बालविकास विभागातर्फ राबविण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलेस 40 हजारापर्यंत लोन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेले होते. 40000 पर्यंतचे लोन हे लाभार्थी महिलेसाठी राज्य सरकारकडून कर्ज म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाईल.
जर लाभार्थी महिला ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्या महिलेला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जुना व्यवसायाला अजून मोठे करायचं असेल तर ही तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली लाडक्या बहिणीसाठी लोन योजना कमी व्याजासहित महिलासाठी सोयीची ठरू शकते. या लोन बद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेऊया तरी हा लेख पूर्णपणे वाचावा.( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana )

newproject 2025 05 12t122209 7232 1747033060

40 हजाराचे लोन घेण्यासाठी पात्रता काय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची खूप मोठी योजना ठरली आहे या योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा मासिक हप्ता दिला जातो आता जर इच्छुक लाभार्थी माहिलेला राज्य सरकार कर्ज देखील देणार आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या महिलांना या कर्जाची आवश्यकता लागेल.
लाडकी बहिण योजनेमध्ये चाळीस हजाराचे जर लोन घेण्यासाठी जी पात्रता असेल त्या पात्रतेचे नियम हे लाडकी बहिण योजनेचे जे निकष आहेत त्याच निकष असतील असे ग्राह्य धरू शकतो परंतु अजून त्यामध्ये कोणती नवीन निकष किंवा नवीन अटी व राज्य सरकारने लागू केल्या नाहीत.

hq720 1 1

जर 40 हजाराची लोन घ्यायचे असेल त्यासाठी खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्हाला या लोन साठी पात्र ठरवले जाईल
1. अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी महिला असावी.
2. अर्जदार महिला आहे ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे म्हणजेच त्या महिलेस आतापर्यंत दहा हप्ते बैंक खात्यात आलेले असणे गरजेचे आहे.
3.अर्जदार महिला सरकारी नोकरीत नसलेल्या कुटुंबातून असावी.
4.अर्जदार महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
5.अर्जदार महिलेचा सिविल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.
6.अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे व डीबीटी सुविधा ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे.
7.जर त्या सर्व निकषांमध्ये महिला पात्र असेल तर त्या महिलेस 40000 पर्यंतचे लोन मिळेल.

hq720 2

लाडकी बहिण योजनेचे 40 हजारांचे लोन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

पास बुक

पासपोर्ट साईज फोटो

मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट

मोबाईल नंबर आधार से लिंक

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

लोन प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा

माझी लाडकी बहीण योजना लोन देण्याचे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व लाभार्थी महिलांचे या लोन कडेच लक्ष लागले आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाभार्थी महिलेस 30 ते 40 हजारापर्यंत लोन देण्याचे घोषणा केली होती पण अजून अर्ज प्रक्रिया किंवा लोन घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही परंतु लवकरच याबद्दल ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत आणि हे सर्व अर्ज लाडकी बहीण योजनेच्या सरकारी वेबसाईटवरूनच महिलेला अर्ज करता येतील.

Majhi Ladki Bahin Yojana Loan

लोन घेण्यासाठी अर्ज कसा करायचा

1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजना या अधिकृत संकेतस्थळावर जायचं.
2.नंतर अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करा.
3.आपलं लॉगिन झाल्यावर त्यामध्ये पूर्ण स्वतःची माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरा.
4.आता होम पेज मध्ये ‘लोन’ हा पर्याय निवडून घ्या.
5.त्यामध्ये तुमचा नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये आवश्यक ती माहिती दिल्याप्रमाणे भरा.
6.त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड करा.
7.आता सबमिट बटन वर क्लिक करून घ्या.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणार 40 हजारांपर्यंत लोन !! प्रक्रिया जाणून घ्या”

  1. Aap pahle 11वीं ki to dalo account mein hamen argent hai aapane bharoso ke lae use per usi ke tahat Ham log kitne kam rok kar baithe Hain so please request kijiye aap Dal do account . mein paise
    Loan Kaise aur kis tarah Le jata Hai uski update De dijiyega bad mein

    Reply

Leave a Comment