Ladki Bahin Yojana On 27 lakh women ineligible
Ladki Bahin Yojana New Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास अडीच कोटी महिला लाभार्थी असून ही योजना महिलांसाठी 2024 मध्ये सुरू केली होती या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ दिला जातो.
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्याची महत्वकांशी योजना आहे. या योजनेमध्ये डिसेंबर पर्यंत विधानसभा निवडणुकीत पर्यंत सर्व लाभार्थी आणि पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे जमा झाले होते.
परंतु निवडणुकीनंतर म्हणजे जानेवारी मध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणीच्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास 9 लाख महिला या अपात्र झाल्या होत्या. आजची मोठी बातमी दिली मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेकी लाडकी बहिण योजनेमध्ये जवळपास 27 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये मध्ये घेऊया.

Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये काही महिन्यापासून महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये चे निकष सुरुवातीला ठरवले होते त्यांनी निकशाच्या बाहेर जाऊन जेव्हा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना या योजनेमधून वगळण्यात येत आहे.
मागील काही महिन्यांमध्ये ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहे अशा महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविकानी पडताळणी केली असता लाखो महिला यामध्ये अपात्र झाल्या आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांच्या अर्जाची तपासणी केली असता त्यामध्ये पण महिला अपात्र झाले होत्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आयकरदाता कोणी जर कुटुंबामध्ये असेल तर त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू होती यामध्ये पण काही जिल्ह्यातील नागपूर, जालना, भंडारा, अमरावती जवळपास या जिल्ह्यातील 80 हजार महिलांना अपात्र करण्यात आले आहे.

27 लाख महिलांना अपात्र – अदिती तटकरे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारेचे 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहिण योजनेच्या लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी केली असता काही कुटुंबामध्ये दोन पेक्षाही जास्त महिला या योजनेमध्ये लाभ घेत असल्याचे निर्देशनास आले आहे आणि त्यानंतर काही महिला एका योजनेपेक्षा जास्त सरकारी योजनाचा लाभ घेत असल्याचे निर्देशनास आले आहेत त्यामुळे जवळपास 26.34 लाख महिला जुलै महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहतील आणि या महिलांना पुढील हप्ता येणार नाही आणि लाडकी बहीण योजनामधून या सर्व महिलांना अपात्र करण्यात येणार आहे.
या सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ हा स्थगित केलेला आहे संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकीच्या ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना पुढील लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana Apatra Mahila List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala ajun july mahinya che paise nahi milalet mazhe husband pan nahi aahet mazhae mula shikat aahet