Ladki Bahin Yojana June Installment Apatra Mahila list
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये 2 कोटी 41 लाख महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र महिलाचे वय हे 21 ते 65 वर्षांमध्ये असणे गरजेचे आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 18000 सर्व पात्र बहिणींच्या खात्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मागील काही महिन्यापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया या योजनेमध्ये चालू आहे त्यामध्ये लाखो महिलांचे नाव हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत.

ladakibahin.maharashtra.gov.in
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडक्या बहिणीचे नाव का वागण्यात येत आहेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये राज्य शासनाचा ध्येय हे गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे.
परंतु या योजनेचा फायदा हा खूप असे गैरप्रकार करणाऱ्या लाडक्या बहिणी निर्देशनास आलेल्या आहेत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाहेर जाऊन ज्या लाभ घेत होत्या त्या सर्व महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम चालू आहे. या योजनेमध्ये मागील महिन्यामध्ये 2289 एवढ्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या असे गैरप्रकार मागील पाच सहा महिन्यापासून दिसून येत आहेत त्यामुळे या योजनेमध्ये अर्जाची कठोरपणे तपासणी होत आहे आणि महिलांना अपात्र करण्यात येते.

आपले नाव अपात्र यादी मध्ये आहे का कसे चेक करायचे

जर चालू हप्ता नाही आला तर काय करायचे
लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपल्याला अगोदरचे पूर्ण हप्ते व्यवस्थितपणे आपल्या बँक खात्यावरती जमा झाले असतील आणि चालू हप्ता हा बँक खात्यामध्ये नाही आला असेल तर जवळील ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालय येथे जाऊन आपल्या अर्जाची व्यवस्थित चौकशी करून घ्यायची आहे आणि आपले पूर्ण डॉक्युमेंट आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर हे योग्य आहे का याची खात्री करायची आणि आपला आधार नंबर हा बँक खात्याशी लिंक करायचं आणि ई केवायसी पण पूर्ण करून घ्यायची आहे. जर हे सर्व गोष्टी व्यवस्थित योग्यरित्या असतील तर तुमचा हप्ता तुमचा बँक खात्यात जमा होईल.

लाखो महिलांचे नाव वागळण्यात आले
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकी अगोदर कोणत्याही महिलांना अपात्र करण्यात आलेले नव्हते परंतु निवडणुकीनंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाहेर जाऊन लाभ घेतात अशा महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 10 लाख महिलांना आतापर्यंत या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा खूप महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि ही अर्जाची पडताळणी प्रक्रिया आता पण चालूच आहे त्यामुळे समोर जाऊन पण लाखो महिला या योजनेतून बाद होतील.

लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरवले होते त्यांनी निकशाच्या आधारे सर्व अर्जदार महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोराने चालू आहे मागील काही दिवसांपासून ज्या महिलेच्या घरी कोणताही व्यक्ती जर आयकर दाता असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि तिला अपात्र करण्यात येत आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.