Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 Rupaye Update :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला 1500 रुपये प्रति महिन्याला लाभ मिळत असतो. मागील वर्षी सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहे यामध्ये करोडो जरूरत मंद महिलांना या योजनेचा खूप लाभ झाला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आता सर्व महिलां वाट पाहत आहे ते 13 वा हप्ता जुलै महिन्याचा कधी पासून बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेऊया.(Ladki Bahin Yojana Jully installment )

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार द्वारा चालवली जाणारी सर्वात मोठी महिलांसाठी ही योजना ठरली आहे यामध्ये कमजोर वर्गातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश हे महिलांना स्वातंत्र्य आणि सामाजिक भागीदारीमध्ये दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न आहे.
या योजनेमध्ये महिलेला 1500 रुपये प्रति महिन्याचा लाभ मिळत असतो हा लाभ ती महिला आपल्या परिवारातील छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करू शकते आणि एखादा छोटा व्यवसाय पण सुरू करू शकते यामुळे खूप महिलांच्या आत्मविश्वास वाढलेला आहे आणि परिवारची आर्थिक जिम्मेदारी पण काही महिला घेत आहेत.

लाडकी बहीण योजना – आदिती तटकरे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत आहे.
मागील जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती त्याचप्रमाणे आता जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती मिळणार अशी पोस्ट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी केली होती. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 1500 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार आहे.

जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी पासूनच वितरण सुरुवात होणार आहे त्यामुळे आता फक्त 48 तासानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये डीबीटी च्या मार्फत जमा होणार आहेत.
सध्या काही महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे ज्या महिला जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असतील आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बरोबर बसत असतील त्याच महिलांना जुलै महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे.

कोणत्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासून काही निकष व अटी ठरवल्या होत्या त्यामध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया काही महिन्यापासून चालू आहे त्यामध्ये खूप महिला या अपात्र पण झालेले आहेत.
मागील महिन्यामध्ये 26 लाख 34 हजार महिला लाडकी बहिण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत आणि काही पुरुषांनी पण लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या नावे अर्ज भरून लाभ घेतलेला आहे अशा पण पुरुषांच्या अर्जांचा पण या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. ज्या महिलांचे वय हे 21 ते 65 वयोगटांमध्ये असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाभार्थी महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि त्या परिवारामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता व्यक्ती नसावा. लाभार्थी महिलेचे आधार लिंक बँक खात्याशी असणे गरजेचे आहे अशाच महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
नविन अर्जदारासठी लाडकी बहिण योजना कधी सुरू होणार आहे
काही महीला चे Approval आले असुन तसेच banking prosess/DBT aadhar update, aadhar seding करुनही अद्याप एकही हप्ता पडला नाही.