Ladki Bahin Yojana Apatra Mahila list :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा सगळीकडे जोरात सुरू आहे एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आला आहे परंतु आता या योजनेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे काही दिवसापूर्वी या योजनेमध्ये तब्बल 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज स्थगित करून ठेवण्यात आलेले आहेत त्यांना जून महिन्याचा हप्ता पण आतापर्यंत मिळालेला नाही.
लाडकी बहिण योजनेमध्ये अपात्र महिलांची यादी ही महिला व बालविकास विभागाकडून यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे परंतु जुलै महिन्यामध्ये पण महिलांचे अर्ज स्थगित करून ठेवण्यात आलेले आहेत त्यांना जुलै महिन्याचा पण हप्ता मिळालेला नाही त्यांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत आहेत आणि त्यामधून किती महिला पात्र आणि अपात्र केल्या जातील याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Apatra Mahila list )

लाडकी बहिण योजनेमध्ये अपात्र होण्याचे कारणे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी काही सुरुवातीपासूनच निकष आणि अटी ठरवल्या होत्या ज्यामध्ये ज्या महिलांनी निकंषाचे पालन केलेले आहेत त्या महिलांना या योजनेत पात्र ग्राह्य धरले जाते आणि या महिलांनी या आणि निकंषाच्याबाहेर जाऊन आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे.
वयाची अट
लाडकी बहिण योजनेमध्ये वयाचा निकष 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे होते परंतु काही महिलांनी 21 वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदरच खोटी कागदपत्रे दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे.
उत्पन्नाची मर्यादा
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील लाभार्थी संख्या
लाडकी बहिण योजनेमध्ये जो निकष ठरवला होता त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ घेतल्याच्या आढळून आलेले आहे.
चार चाकी वाहन
अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर सोडून बाकी कोणतेही चार चाकी वाहन आढळल्यास त्या महिलेला योजनेतून अपात्र करण्यात येईल.
इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ
अर्जदार महिला हे दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणारी नसावी.

पात्रता
1.महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2.राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3.कमीत कमी वय २१ वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4.लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता
1.ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
2.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
3.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या 4.स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
5.सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/– किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
6.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
7.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
8.ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

अपात्र महिलांची यादी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जोरावर चालू असलेले अर्जाची पडताळणी प्रक्रिया आणि त्यामध्ये अपात्र महिलांची संख्या ही वाढत चालली आहे.
जून महिन्यामध्ये पण 26 लाख च्या जवळपास महिला ह्या अपात्र होण्याच्या वाटेवर आहेत त्यांचा अर्जाची कठोरपणे चौकशी चालू आहे आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या पण हप्ता वितरण हे रक्षाबंधनाच्या वेळी झालेले आहे परंतु त्यामध्ये पण जवळपास 16 जिल्ह्यातील 26 लाख महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामुळे लाखो महिलांचे अजून जून आणि जुलै महिन्याचे हप्ते हे स्थगित आहेत त्यांना त्यांच्या अर्जाची पूर्णपणे चौकशी होऊन त्यामधील पात्र महिलांची यादी वेगळी आणि अपात्र महिलांची यादी वेगळी करण्यात येईल त्यानंतर त्यांना पुढील लाभ दिला जाईल. ज्या महिला या चौकशीमध्ये अपात्र होतील त्या महिलांना या योजनेमध्ये पुढील हप्ता मिळणार नाही आणि ती महिला या योजनेतून अपात्र होईल.

यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.