Ladki Bahin Yojana e KYC Last Date Update News :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये पात्र महिलांची वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 19 हप्त्याचे वितरण हे पूर्ण झालेले आहे आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात सर्व १९ हप्त्याचे वितरण हे आहे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आता केवायसी करण्यासाठी फक्त शिल्लक दहा दिवस राहिले आहेत केवायसी बद्दल संपूर्ण माहिती आणि अपडेट चालू घडामोडी आपण या मध्ये सविस्तरपणे पाहूया.Ladki Bahin Yojana e KYC Last Date Update News
केवायसी प्रक्रिया सुरू का झाली
लाडकी बहिण योजनेमध्ये सुरुवातीपासून या योजनेचे काही निकष ठरवले होते त्यामध्ये ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे ज्या महिलांच्या घरी कोणी व्यक्ती आयकर दाता असेल किंवा त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल असे काही या योजनेचे निकष सुरुवातीपासूनच ठरवले होते.
या निकषांच्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता किंवा या योजनेमध्ये मागील काही काळामध्ये अनेक पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावे अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता या काही अनेक कारणामुळे या योजनेमध्ये काही महिन्यापासून ही केवायसी प्रक्रिया पात्र महिलांसाठी करणे बंधनकारक केलेली आहे. यामुळे या योजनेचा लाभ चुकीचे व्यक्ती घेऊ नये यासाठी केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेले आहे.

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
योजनेतील महिला अपात्र का
लाडकी बहिण योजनेमध्ये मागील काही महिन्यांमध्ये अनेक महिला ह्या अपात्र झालेले आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये ज्या महिला बसल्या नाही किंवा अंगणवाडी सेविकाच्या मार्फत घरोघरी जाऊन पात्र महिलांचे अर्जाची पडताळणी केली असता अनेक महिला या योजनेतून बाहेर जाऊन लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात गळ्यात आलेले होते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे या योजनेमधून अपात्र होऊ शकतात कारण लाडकी बहीण योजनेमध्ये 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची अगोदरची शेवटची तारीख होती त्यामध्ये लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी असल्यामुळे ती मुदतवाढ करून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे आणि ही शेवटची संधी आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते म्हणून लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून किंवा दुरुस्त करून आपल्या पुढील लाभ प्राप्त करा.

केवायसी प्रक्रियेसाठी फक्त दहा दिवस शिल्लक
लाडकी बहीण योजनेमध्ये आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्यांना हे शेवटचे दहा दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया मागील काही महिन्यांमध्ये पूर्ण झाली होती परंतु ज्या महिलांचे प्रश्न मध्ये गोंधळ असल्यामुळे किंवा प्रश्नांमध्ये काही चुकीचे पर्याय निवडले होते त्या महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया मधील दुरुस्ती करून घ्यावी. जर या 31 मार्च 2026 पर्यंत ज्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल त्याच महिलांना या योजनेमध्ये पात्र गृहीत धरले जाईल आणि पुढील लाभ मिळत राहील.👍

पुढील हप्ता कधी येईल
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या सर्व महिला वाट पाहत आहेत त्या थकीत हप्त्याची किंवा पात्र महिला वाट पाहत आहेत ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दल सर्व महिला आशेवर बसले आहेत.
या योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला आहे त्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 31 मार्च नंतर काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया वेळाने झालेली आहे त्या महिलांची यादी ही विभागाकडे प्राप्त होईल त्यानंतरच त्या महिलांना म्हणजेच 31 मार्च नंतर मागील थकीत हप्ते सोबत चालू हप्ता पण मिळण्याची शक्यता आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Desembar pasun paise nahe ali
Kadhi yenar ahet te saanga rikamya Post Karu nka time pass karu naka