Ladki Bahin Yojana : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची लाडकी बहीण (mukhyamantri mazi ladki bahin yojana ) योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे आंणि रक्षाबंधना परियंत पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 21 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana ) घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 60 लाख 74 हजार 180 महिलांनी अर्ज केले आहेत.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Mazi Ladki Bahin Yojana चे लाभ
1. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.
2 .या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, जी DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
3.आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी 3000 रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
4.महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
5.या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
6.या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
7.माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते.
लाडकी बहिन योजना DBT स्थिती चेक करा
सध्या महिलांनी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेच्या लाभार्याथी यादीत असलेल्या महिलांना आपल्या बँक खात्यात आधार कार्डसह लिंक करणे आवश्यक आहे. त्यांना ज्या महिलांचे बँक आधार कार्डसह लिंक नाहीत, त्यांना योजनेच्या पहिली किश्तींचा लाभ मिळवणार नाही.लाडकी बहिन योजनेतील पैसे DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात, ज्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात DBT सक्रिय असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना लाडकी बहिन योजनेत पैसे मिळत नाहीत, त्यांनी आपली बँक आधार लिंकिंग स्थिती तपासणे आवश्यक आहे.
आधार कार्डसह बँक खाते लिंक करणे का आवश्यक आहे हे कारण की लाडकी बहिन योजनेच्या पैसे DBT पद्धतीने महिलांच्या खात्यात पोहोचतात.
Mazi Ladki bahin yojana first installment Credit | लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
नारीशक्ती दूत ॲपवरून माझी लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?
1.यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करावे लागेल.
2.ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने येथे लॉग इन करावे लागेल.
3.तुम्ही ॲपवर लॉग इन करताच तुम्हाला “Or Eastern Request” चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
4 .आता तुमच्या समोर एक नवीन स्लाइड उघडेल, येथे तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
5.लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करताच योजनांची यादी तुमच्या समोर येईल. तुम्ही तुमचे नाव येथे तपासू शकता.
लाडकी बहीण योजनेसाठी मार्च 2025 पर्यंतची तरतूद –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च 2025 पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख | Ladki Bahin Yojana Last Date
ज्या महिलांना 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता 3000 रुपये मिळाला आहे यानंतरचा पात्र महिलांना पुढील सप्टेंबर महीन्या मध्ये तीन महिन्याचा म्हणजेच 4500 रुपये येणार आहेत पुढील महिन्यात 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. काल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजनेच्या शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 केलेली आहे कारण महाराष्ट्रातील खूप महिला चे फॉर्म अजून पण पेंडिंग आहेत आणि खूप महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाहीयेत म्हणून ही अंतिम तारीख वाढवून 30 सप्टेंबर केलेली आहे
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.