Ladki Bahin Yojana 12th June Installment 1500 Rupaye Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना बनली आहे या योजनेमध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत पात्र लाभार्थी महिलेला दर महिना 1500 रुपयांचा लाभ हा डीबीटी द्वारे डायरेक्ट महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण हे दर महिना 1500 रुपये प्रमाणे 11 हप्त्याचे 16 हजार 500 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. लाभार्थी महिला आहे आता जून महिन्याचा हप्ता आजचा शेवटचा दिवस असून महिन्याचा आलेला नव्हता परंतु आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खुशखबर दिलेली आहे जून चा हप्ता आज पासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Maharastra Online Apply )

Ladki Bahin Yojana Maharastra Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून हप्ता 1500 रुपये जमा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये 12 वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा 12 हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार याबद्दल सर्व महिलामध्ये चिंतेचे वातावरण होते परंतु आता काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचा निधी 3600 कोटी रुपये हे महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आज पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये आजपासून जमा होणार आहेत.
मंत्री अदिती तटकरे यांनी अजित दादा पवार यांच्या वक्तव्यावरून उद्या महिला व बालविकास विभागाकडून सर्व पात्र लाभार्थी महिलेच्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आता जूनचा हप्ता आजपासून एक दोन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होईल.
जून चा हप्ता येण्यास विलंब का
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये जून महिन्याच्या आज 30 तारीख असून पूर्ण महिना ओलांडला तरी पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा आलेला नव्हता त्याचे कारण असे की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू आहे.
त्यामुळे जून महिन्याचा हप्ता येण्यास विलंब होत होता आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी प्रक्रिया चालू होती आणि लाभार्थी महिलांच्या घरामध्ये कोणी आयकर भरते का याबद्दल पडताळणी प्रक्रिया चालू होती ही आयकर प्रक्रिया चालू असल्यामुळे आयकर विभागाकडून डाटा येण्यास विलंब होत होता त्यामुळे जूनचा हप्ता 1500 रुपये हा येण्यास विलंब झाला आहे परंतु आज पासून जून महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत.

3000 कसे मिळतील
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता हा अजूनही आलेला नाही आणि जून महिन्याचा हप्ता येणार आहे अशा महिलांना मे महिन्याचा पंधराशे आणि जून महिन्याचे पंधराशे हे एक दोन दिवसांमध्ये एकूण 3000 रुपये त्या महिलेला मिळतील.
लाडकी बहीण योजनेमध्ये काही कारणास्तव ज्या ज्या महिलांना मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले नाहीत त्या महिलांना मे आणि जून महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होऊ शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना -अदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.