Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावर १७ ऑगस्टपर्यंत पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्याची सुरुवात १४ ऑगस्टपासून करण्यात आली होती अन जमा पं झाले. १५ ऑगस्ट रोजी साधारण ४८ लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. १७ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत . त्यामुळे ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्यांना वाट पाहावी लागेल.या योजनेत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण ३००० रुपये असा पहिला हप्ता मिळत आहे. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे रक्षाबंधनाच्या आधीच पैसे जमा झाल्यामुळे महिला खुश झाल्या आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ९६ लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे. दरम्यान, या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत दि. 17 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुंबई शहर जिल्हयातील 9327 इतके Disapproved म्हणजे रद्द केलेले अर्ज आहेत त्या अर्जतील त्रुटी पूर्ण करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहर जिल्हयातील सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे व अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व
१. महिला
२. समुह संसाधन व्यक्ती
३. बचत गट अध्यक्ष
४. बचतगट सचिव
५. गृहणी
६. अंगणवाडी सेविका/मदतनीस
७. ग्रामसेवक
८. वॉर्ड अधिकारी
९. सेतु
१०. बालवाडी सेविका
११. आशा सेविका
१२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका)
या सर्वाना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनें मधील महिलांचे अर्ज त्यानी भरले होते या सर्वाना सागितले आहे लाभार्थी महिलांचे फॉर्म परत बरोबर आहे का नाहीत टे तपासून व काही त्रुटी असतील तर पुर्तता करुण भरावे असे अवर्जुन आवाहन करण्यात आले आहे . नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापुर्वी केलेले ‘अर्ज’ या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Approved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुध्दा पाहता येतील.
लाडकी बहीण योजनामधील महिलांनी लक्षात ठेवायची गोष्ट
सर्व संबंधीतांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन त्यांचा अर्ज रद्द होण्याचे कारण ‘View Reason’ या टॅबवर बघुन त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.
Mazi Ladki Bahin Yojana चे लाभ
-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.
-या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, जी DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
-आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी 3000 रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
-महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
-या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
-या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.