Ladki Bahin Yojana e kyc process update news :
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू असलेल्या ही केवायसी प्रक्रियेच्या गोंधळामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास कार्यालयाच्या बाहेर लाडक्या बहिणीने अफाट गर्दी केलेली आहे आणि गोंधळ घातलेला आहे हा गोंधळ सर्व प्रसार माध्यमातील अफवांमुळे पसरलेला आहे बातमी अशी की प्रसारमाध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र झालेले आहेत किंवा ज्या महिलांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा महिलांनी व केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांनी महिला व बाल विकास कार्यालयाच्या बाहेर रांगाच रांगा लावल्या आहेत.
प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्या महिलांना ऑफलाइन पद्धतीने महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन आपले कागदपत्रे सादर करायचे आहेत आणि आपली केवायसी पूर्ण करा अशी अफवा पसरली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया आणि ही अफवा खोटी आहे का खाली आहे याबद्दल माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana e kyc process update news /march april hapta upadate

Ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
किती महिलांची केवायसी बाकी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते सर्व लाडक्या बहिणीच्या बँकांच्या जमा झाले होते त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता केवायसी प्रक्रियेमुळे रखडला होता. केवायसी प्रक्रियेची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 दिली होती यामध्ये लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया ही अजूनही बाकीच आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या केवायसी प्रक्रिया ही लाडक्या बहिणीसाठी बंधनकारक केली होती त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला दोन कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या त्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांची संख्या ही 67 लाख एवढी आहे सध्या लाभार्थी महिलांची संख्या एक कोटी 77 लाख एवढीच आहे त्यामुळे उर्वरित लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ता मिळणार का नाही किंवा आम्ही अपात्र झालोत का असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात उद्भवत आहेत. याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती राज्य शासनाने दिलेली नाही.

केवायसी बद्दलची अफवा खोटी
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे आणि ज्या महिलांनी केवायसी प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा अशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा दुरुस्ती केलेली नाही अशा महिलांना प्रसारमाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार त्या महिला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस करत आहेत.
परंतु महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात येत आहे की असा कोणताही जीआर किंवा घोषणापत्र विभागात विभागीय कार्यालयामध्ये आलेले नाही त्यामुळे ज्या महिलांची किंवा अशी प्रक्रिया बाकी आहे त्या महिलांनीजोपर्यंत परिपत्रक येत नाही तोपर्यंत शांत राहावे असे कार्यालयाचे अधिकारी सांगून महिलांना शांत करत आहेत. लाडक्या बहिणींना खोट्या बातम्या वरती विश्वास ठेवू नये आणि जिल्हा जिल्हास्तरीय महिला व बालविकास कार्यालयामध्ये कोणतेही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही किंवा केवायसी प्रक्रिया तिथे पूर्ण करून दिली जात नाही हे सरळ खोटी बातमी आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता उर्वरित महिलांना
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि त्या महिलांचे पात्र यादी मध्ये नाव आलेले होते त्या महिलांना 13 मे रोजी मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हप्ता वितरण सुरू झाले होते त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये त्याच महिलांना एप्रिल महिन्याचा पण हप्ता पंधराशे रुपये वितरित करण्यात आला.
परंतु दोन्ही हप्त्याचे 151500 देताना राज्य सरकारला निधी कमी पडला असल्यामुळे लाखो महिलांना केवायसी पूर्ण असून किंवा पात्र असून सुद्धा महाराजांनी प्रेरणाचा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना आता राज्य सरकारने परत जीआर काढून 730 कोटी रुपयांचा निधी मार्च एप्रिल महिन्याच्या हप्ता विचारण्यासाठी विभागाकडे सुपूर्त केला आहे त्यामुळे लवकरात लवकरच ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये मिळून एकत्रितपणे तीन हजार रुपये येणार आहेत.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.