Ladki Bahin Yojana Complaint process :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून लाखो महिला या योजनेतून अपात्र झालेले आहेत त्यामध्ये जवळपास 80 लाख महिला या योजनेतून अपात्र यादीमध्ये त्यांची नावे आल्यामुळे त्यांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेमध्ये मे महिन्याचा हप्ता मागील काही दिवसांमध्ये फक्त पात्र महिलांनाच मिळालं ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होती आणि अर्जाची पडताळणी प्रक्रिया पण पूर्ण निकषांमध्ये बसत असल्यामुळे अशाच महिलांना मे महिन्यापर्यंतचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत परंतु अजूनही लाखो महिला या योजनेतून लाभापासून वंचित आहेत. लाडक्या बहिणींची तक्रार अशी पण आहे की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे याबद्दल आता पुढील तक्रार आणि काय करायचे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Complaint process

हप्ता बंद झाला तक्रार कशी करायची
1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे
2.त्यानंतर डॅशबोर्ड वरील तक्रार हा पर्याय निवडायचा आहे.
3.माझा तक्रारी या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कृपया योग्य तक्रार व श्रेणी निवडा अन्यथा तक्रार नाकारली जाऊ शकते असे दिसेल ही सूचना वाचून घ्या
4.आता तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये तक्रार पर्याय दिसेल त्यामध्ये दोन-चार पर्याय दिसतील त्यामध्ये तुमचा पर्याय तुमची तक्रार कोणती आहे ते निवडा.
5.आता तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसेल त्यामध्ये चार-पाच पर्याय दिसतील त्यामधील तुमचे हप्ता रिजेक्ट झाला का हप्ता जमा नाही झाला आधार लिंक समस्या तुमच्या कोणती तक्रार आहे त्यामध्ये पण तुम्हाला पर्याय दिसतील त्यामधील योग्य पर्याय निवडा.
6.आता तुम्हाला पूर्ण पर्याय योग्य पद्धतीने निवडले असतील तर तुमच्या तक्रार योग्य असेल तर सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
जर तुमचा अर्जाची तक्रार दिलेल्या पर्यायांमध्ये योग्य बसत असेल तर पुढील फॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध होईल तो फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे.
7.अशाप्रकारे तुमची तक्रार घेतली जाईल.

तक्रार केल्यानंतर पुढे प्रक्रिया काय असेल
तुमची तक्रार संबंधित विभागाकडे पाठवले जाते.
त्यानंतर ती तक्रार अधिकाऱ्याकडून तपासली जाते.
त्यामध्ये जर दुरुस्ती काही असेल तर ती केली जाते.
आणि तुमचे स्टेटस तुमच्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेसमोर दिसून जाईल.
या सर्व गोष्टीसाठी कमीत कमी पंधरा दिवसाचा वेळ लागत असतो.

आपले स्टेटस कसे चेक करायचे
सर्वप्रथम जर आपला कालावधी संपला असेल तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
त्यानंतर आपले फोटो वरती युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
आता तुम्हाला तक्रार या पर्यावरणाची क्लिक करायचे आहे.
त्यानंतर कंप्लेंट आयडी वापरून स्टेटस तुम्हाला दिसेल.
स्टेटस मध्ये चार पर्याय आपल्या अर्जाच्या पुढे दिसतील त्यामध्ये पेंडिंग, इन प्रोसेस आणि रिसॉल असे दिसेल.

जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल
लाडके बहिण योजनेमध्ये आता ज्या महिलांची केळशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अर्जाची पडताळणी प्रक्रिया पण पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे.
योजनेमध्ये ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच मे पर्यंतचे हप्ते पूर्णपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत त्या महिलांना कोणतीही अडचण जाणार नाही त्यांना सगळीकडे लाभ मिळणार आहे परंतु ज्या महिलांचे आत्ता पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल की ज्यांच्या अपात्र यादीमध्ये नाव होते जर त्या महिला पात्र झाल्या असतील तर त्या महिलांना मे जून महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की पुढील आठ दिवसांमध्ये जून महिन्याचा पण हप्ता येण्याची शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.