Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिनींना या योजनेचा (Ladki Bahin Yojana ) लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. ज्यामूळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा केले जात आहेत. 1 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना सद्धा सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील.
महिलांना बैंकमध्ये काय अडचणी येत होत्या ?
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana ) पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे, त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमिम बॅलेन्स, मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे चर्जेस तसे इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 तसेच 3000 रुपयांतील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही.
राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या |
राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनां महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सागितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana ) मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
4500 कसे जमा होणार?
खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै,ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर सप्टेंबरआधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी मार्च 2025 पर्यंतची तरतूद –
Ladki Bahin Yojana उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च 2025 पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.