Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana :महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केलेली आहे. अजित पवार यांनी रविवारी बारामतीतील रॅलीमध्ये राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पैसे कधी मिळणार याबाबत मोठी घोषणा केलेली आहे.
या दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजना पैसे | Majhi ladki Bahin Yojana 1500 Hafta
महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण योजना अशी लाडकी बहीण योजनाची ख्याती सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे कधी येणार व त्यांना कधी योजनेचे पैसे मिळणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील रॅलीमध्ये स्पष्ट सांगून ठेवले आहे. महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना महायुती सरकारने आणल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकारला निवडून नाही दिला तर योजना नीट राबणार नाही असं अजित पवारांनी बारामतीतील आपल्या भाषणात सांगितले. लाडक्या बहिणीचे पैसे येत्या रक्षाबंधनाला तीन हजार रुपये प्रत्येकी महिलांच्या खात्यात जमा होणार असे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kab aayege account mein?? Sab check kar liya… aadhar bhi linked hai account se.