Ladki Bahin Yojana March & April Installment 3000 Rupaye :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील लाखो महिला मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबद्दल आता आनंदाची बातमी आली आहे दोन्ही महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार असल्याचे बातमी समोर आली आहे.
लाडके बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया बंधनकारक केले होते त्यामध्ये लाखो महिलांचे केवायसी सुद्धा बाकी असल्यामुळे आणि केवायसी मध्ये परत परत मुदतवाढ देऊन ती पण आता मुदतवाढ संपली असून आणि काही तांत्रिक कारणामुळे व केवायसी मधील पात्र अपात्र महिलांची यादी वेगळी करून आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता दोन्ही पण एकत्रित तीन हजार रुपये लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladli Bahin Yojana March & April Installment 3000 Rupaye

पात्र अपात्र महिलांची यादी
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया ज्या महिलांची पूर्ण झालेली आहे त्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा मिळून तीन हजार रुपये हप्ता येणार आहे. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही 30 एप्रिल 2026 च्या अगोदर पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा हप्ता पण त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याच महिलांना आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही 30 एप्रिल 2026 पर्यंत सुद्धा पूर्ण झालेली नाही अशा महिलांना आता लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजेच त्या महिलांचे हफ्ते सर्व बंद होतील आणि त्या महिला या योजनेतून अपात्र होतील.

किती महिलांना हप्ता मिळेल
लाडकी बहीण योजनांमध्ये काही महिन्यापासून पात्र महिलांना केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली होती परंतु लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया आहे बाकी असल्यामुळे केवायसी प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा मुदतवाढ देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे परंतु आता शेवटचे मुदतवाढ म्हणजे एक 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान महिला व बाल विकास मंत्री आणि तटकरे यांनी केले होते त्यामध्ये जवळपास 1 कोटी 90 लाख महिलांचीच केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे.
योजनेमध्ये जवळपास 64 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा त्या महिला या योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेत असल्याचे दिसले त्यामुळे या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजेच त्या महिला पात्र होतील.

तीन हजार रुपये कधी मिळतील
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ही केवायसी प्रक्रियामध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे या निधी वितरणास विलंब झाला होता मात्र आता हा अडथळात दूर झाला असून सरकारने मे महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये देण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 11 मे पासून जमा होण्याची दाट शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.