Ladki bahin yojana online apply website maharashtra
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणा केली. योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना देण्याचे निर्धार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. ही घोषणा होताच सरकारी कार्यालय व सेतू केंद्रात महिलांची एकच गर्दी बघायला मिळाली, ही गर्दी कमी करण्या साठी महाराष्ट्रतील शिंदे सरकारने ऑनलाईन लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर लॉन्च केलेला आहे. तरी सरकारने सर्व महिलांना या ॲपद्वारे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरावा ही विनंती केली आहे, तर आपण बघूया की कसा आपण घरबसल्या नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड करून आपण आपला अर्ज घरबसल्या भरू शकता .
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
नारी शक्ती दूत ॲप मघून घरबसल्या करा अर्ज| Ladki bahin yojana online form kasa bharava
1.सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करायचा आहे.
2.नारीशक्ती दूत ॲप ओपन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी देऊन टर्म अँड कंडिशन वर क्लिक करून लॉगिन करायचं आहे.

3.तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीच्या प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट सदस्य, गृहणी आणि ग्रामसेवक या गोष्टी भरून आपला प्रोफाइल आपण अपडेट करायचा आहे.
4.नारी शक्ती दूत ॲप मध्ये लॉगिन केल्यावर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्याय दिसेल तो निवडायचे आहे.
5.नारी शक्ती दूत ॲप ला लोकेशनची परमिशन द्यायची आहे.

6.नंतर तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या अर्ज येईल.
7.लडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये आपल्याला आधार कार्ड प्रमाणे आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, आधार कार्ड क्रमांक व तुम्ही शासनाच्या कोणत्याही अतिरिक्त 8.योजनेचा लाभ घेतला असेल याची सविस्तर माहिती भरायची आहे.

9.तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण नाही या पर्यायावर क्लिक करा .
10.वैवाहिक स्थिती काय त्याच्याबद्दल माहिती टाका.
11.लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा तुमच्या जन्म पर प्रांतात किंवा महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यात जन्म झाला असेल तर नाही किंवा हो या पर्यायावर क्लिक करा.

12.त्यानंतर ज्या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत.
कागदपत्रे मध्ये आपल्याला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचे दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, अर्जदाराचे हमी पत्र, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे आपल्याला लाडकी बहीण योजना यामध्ये अपलोड करायची आहे.
13.हे सर्व प्रक्रिया झाल्यावर अर्जदार महिलांनी आपला फोटो काढून ई केवायसी करायची आहे आणि एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचे आहे.

14.त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली सर्व कागदपत्रे एकदा तपासून त्यानंतर खात्री करूनच तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे आता एक ओटीपी नंबर आपण व्हेरिफाय करून घ्या.
15.अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरल्या मोबाईल मध्ये भरू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्राच पीडीएफ कसा भराव
hamipatra for ladki bahin yojana pdf downloaD
- तुम्ही या अधिकृत वेबसाईट वरून हमीपत्राच पीडीएफ डाउनलोड केल्यावर ते तुम्हाला अचूकपणे भरावे लागेल.
- तुमचे सर्व वैयक्तिक माहिती तुमच्या संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर टाका.
- उत्पन्नाचे घोषणा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक वर्षात उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- रोजगाराची स्थिती तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नौकरी, नियमित किंवा कायम कर्मचारी नाही हे नमूद करावे.
- तुम्ही इतर सरकारी योजनेमध्ये 1500 रुपये पेक्षा जास्त किमतीच्या कोणती आर्थिक लाभ घेतलेला नाही हे सांगावे.
- जमीन आणि वाहन मालकी ची नोंदणी स्थिती घोषित करावे.
- आधार कार्ड व्हेरिफिकेशन करावे याचे घोषणा द्यावी.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
नमस्कार दादा, माझ्या आई चे पैसे जमा नाही झाले आहेत. कृपया आपण काही मार्गदर्शन करावे. की कसे आम्ही लाडकी बहीण योजना चे लाभ घेऊ शकतो.
Rejected application sathi edit or resubmit option dyawa
Sir majha form bharlach gela nhi tari form submit aahe ase sangtat n resubmit ase yet aahe