Mukhyamantri Ladki Bahin Yojana eKYC Last Date
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC Last Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीने राज्यातील गरीब मुलांसाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा योजनेच्या मुख्य हेतू आहे.
या योजनेच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हप्ता मानधन त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो.
आतापर्यंत 15 महिन्याच्या हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे, पण या योजनेत काही महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे असे आढळल्याने संबंधित महिला व बालविकास विभागाकडून या योजनेत संपूर्ण महिलांची ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc
त्यामुळे सर्व महिलांनी केवायसी केल्यानंतर योग्य महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया राबवली जात आहे.
आता या योजनेच्या साठी महिला व बालविकास विभागाने केवायसी करण्याची शेवटची तारीख घोषणा केलेली आहे तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

लाडकी बहीण ई केवायसी शेवटची तारीख काय आहे | Mukhyamantri Ladki Bahin Yojana eKYC Update
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ योग्य महिलांना भेटावा यासाठी ई केवायसी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc
केवायसी प्रक्रिया करणे सर्व महिलांना अनिवार्य करण्यात आलेले आहे यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून त्यासंदर्भात अधिकृत पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर च्या साह्याने येथे ओ टी पी पडताळणी केवायसी करायची आहे .
ekyc करताना खूप सार्या महिलांना तांत्रिक अडचणी येत होत्या, त्याची दखल घेत पोर्टलची सुधारणा करण्यात आलेली आहे.
आणि आता eKYC सुरळीत होत आहे अशी माहिती आहे.Ladki Bahin Yojana e kyc Online Apply
त्याचप्रमाणे सर्व महिलांना 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे, त्यामुळे महिलांना १८ नोव्हेंबर तारखेपर्यंत इ केवायसी अंतिम तारीख आहे.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे | majhi ladki bahin yojana e kyc Online
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे.
यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.
Ladki Bahin Yojana e-KYC कसे करायचे? Ladki Bahin Yojana e kyc Online Apply

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (eKYC) कशी करावी (मोबाईलवरून) Ladki Bahin Yojana ekyc Online Mobile
- ई-केवायसी सुरू करण्याची प्रक्रिया:
तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून ladkibahine.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर Website दिसणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार क्रमांक टाका:
नवीन पेजवर, ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक Aadhar Card Number टाका.
दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि “मी सहमत आहे” या पर्यायावर टिक करा.”ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.
- ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन:
लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक aadhar card link असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल .
तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक:

आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल, तर पतीचा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा Captcha भरा, “मी सहमत आहे” वर टिक करा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा..
पती किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी OTP Submit टाकून सबमिट करा.
(टीप: ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पर्याय आल्यास आपल्याला माहीत उपलब्ध करून देण्यात येणार)
- जातीचा प्रवर्ग निवडा:
आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (कॅटेगरी) निवडायचा आहे, जसे की SC, ST, OBC, VJ (A), NT (B), NT (C), NT (D), SBC किंवा Open/General.
- डिक्लेरेशन (घोषणा) आणि माहितीची पडताळणी:
पहिला प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत.” या प्रश्नासाठी तुम्हाला ‘होय’ YES निवडायचे आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे.
दुसरा प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” हे एक डिक्लेरेशन Declaration आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा ‘होय’ YES निवडायचे आहे.
दोन्ही ठिकाण ‘होय’ YES निवडल्यानंतर, दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल, यावर टिक करून “सबमिट करा” Submit बटणावर क्लिक करा.
- ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण:
“तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल, याचा अर्थ तुमची केवायसी झाली आहे.


a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Help me