Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री यांनी सांगितले, 4,500 रुपये मिळतील लाडकी बहिण योजनेचा आकड़ा 2 कोटी पार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) ही सर्वात महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 परियंत ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैसे येण्यास सुरुवात पं झालेली आहे .सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाचवेळी योजनेचे (Ladki Bahin Yojana )पैसे जमा होतील. जिल्ह्यातील पाच लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. राज्यात १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक नोंदणी ९ लाख ७४ हजार ६६ एवढी पुणे जिल्ह्यातील आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे त्यामध्ये सर्व जण उपस्थित राहणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार आहे म्हणजेच लाभार्थी महिलांना लाडके बहिण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये देण्यास सुरुवात झाली होती ती आज पूर्ण होऊन जाईल.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेतील महिलांची संख्या 2 कोटी 50 लाख होऊ शकते


17 ऑगस्ट नंतर ज्या लाभार्थी महिला असतील त्यांना पुढील महिन्यांमध्ये पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ज्या लाडके बहिणीचे मध्ये लाभार्थी महिला आहेत त्यांचे फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले असतील त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत मुददत दिलेली आहे तोपर्यंत त्यांनी फॉर्म पूर्ण करायचे आहेत. आज भाषणामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले आहे की महाराष्ट्र मध्ये 2 कोटी 50 लाख महिला या योजनेसाठी पात्र होतील आणि म्हणजेच आजपर्यंत 1 कोटी 60 लाख अर्ज आलेले आहेत ते वाढतील असा अंदाज अजित दादा पवार यांनी दर्शविला आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळणारच आहे थोडा उशिरा का होईना पण मिळालेच असं अजित दादा म्हणाले.

लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख | Ladki Bahin Yojana Last Date

ज्या महिलांना 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता 3000 रुपये मिळाला आहे यानंतरचा पात्र महिलांना पुढील सप्टेंबर महीन्या मध्ये तीन महिन्याचा म्हणजेच 4500 रुपये येणार आहेत पुढील महिन्यात 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. काल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजनेच्या शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 केलेली आहे कारण महाराष्ट्रातील खूप महिला चे फॉर्म अजून पण पेंडिंग आहेत आणि खूप महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाहीयेत म्हणून ही अंतिम तारीख वाढवून 30 सप्टेंबर केलेली आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…


१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment