Ladki Bahin Yojana April Installment 1500 Out :
Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे यामध्ये महिलांचे सशक्तीकरण त्यांच्या आर्थिक सामाजिक सुरक्षा उद्देश हा योजनेतून आहे.
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयेची आर्थिक मदत देण्यात येते. एप्रिल महिन्याचे फक्त 4 दिवस शिल्लक असताना सुद्धा अजून एप्रिल महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता आलेला नाही तो कधी येणार त्याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊया.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
अर्जाची पडताळणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकशाच्या आधारे अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे चार चाकी वहान अर्जदार महिलेच्या घरी आहे किंवा नाही त्याची फेर तपासणी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये पण जवळपास 9 लाखापर्यंत महिला या अगोदर अपात्र झाल्या होत्या. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाही त्या महिलांना आता वळण्यात येत आहे त्यामुळे योजनेचे निकष जे ठरवले आहे त्यानुसार एक एक निकषावर काम करून सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हप्ता येण्यास विलंब होत असल्याचे दिसून येते.

महिलेच्या उत्पन्नाची पडताळणी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेमध्ये सध्या अर्जदार महिलेच्या उत्पन्नाची सखोल चौकशी सुरू आहे ज्या ज्या महिलांमध्ये पात्र आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यास महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे आता सध्या ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे की कमी आहे त्याची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यांना हा निकषा शेवटचा असल्यामुळे पण एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास विलंब होत आहे जशी ही महिलाच्या उत्पन्नाची पडताळणी प्रक्रिया संपेल तेव्हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता 1500 रुपये हा महिलांना देण्यात येऊ शकतो.

कुणाला 500 तर कुणाला 1500
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्माननीय योजनेतून वार्षिक 12 हजार रुपये महिलांना मिळत असतात या योजनेतून ज्या महिला लाभ घेत आहे त्यांची फेर तपासणी पूर्ण झाली त्यामध्ये 774148 इतक्या महिला या दोन्ही योजनेचा लाभ घेताना निदर्शनास आले आहेत. त्यामुळे 774148 इतक्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आले आहे. आणि ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपयांचा लाभ मिळतो त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिला पीएम किसान निधी योजनेचा लाभ घेता येत त्यांना या योजनेमध्ये वगळण्यात येईल असे स्पष्टपणे महिला व बाल विकास मंत्री आजची तटकरे यांनी प्रसार मध्य्माशी बोलताना स्पष्टपणे सांगितले होते आणि ज्या महिला पात्र आहेत त्याना 1500 रुपयेच लाभ मिळेल.

एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 कधी येईल
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच अक्षय तृतीयेच्या अगोदर सर्व महिलांचा बँका तर एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 एप्रिल च्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेत अर्ज केलेल्या महिलांची पडताळणी सुरू आहे विशेषता अर्जदार महिलांचे उत्पन्न तपासले जात असून अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत अपात्र महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि या महिला अपात्र होणार आहे त्यामुळे एप्रिल हप्ता येण्यास विलंब पण होऊ शकतो ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या असतील त्यांनाच एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे.Ladki Bahin Yojana 10th Installment Date


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
🙏🙏