Ladki Bahin Yojana e KYC Process Apatra Mahila List :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी लाभदायक योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीला या योजनेमध्ये दोन कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या त्यानंतर लाडके बहीण योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेत होत्या अशा महिलांची छाटणी करून लाभार्थी महिलांची घट झाली.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला अर्जाची पडताळणी करण्यात आली ही अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविकाच्या मार्फत करण्यात आली त्यामध्ये लाखो महिला या योजनेतून अपात्र झाल्या त्यानंतर काही महिन्यापूर्वी केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती त्यामध्ये सुद्धा लाखो महिला या योजनेतून अपात्र झाले आहेत सूत्राच्या माहितीनुसार जवळपास 65 लाख महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा रखडलेला हप्ता कधी येणार हे पाहूया.Ladki Bahin Yojana e KYC Process Apatra Mahila List

केवायसी प्रक्रिया संपली
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया ही पात्र महिलांसाठी बंधनकारक प्रक्रिया केली होती त्यामध्ये ज्या महिला या योजनेचा चुकीचा पद्धतीने लाभ घेत आहेत आणि या योजनेतील जे निकष ठरवले होते त्यानी निकशांच्या बाहेर ज्या महिला या योजनेचा लाभ घेता येत अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम राज्य सरकार करत होते.
केवायसी प्रक्रियेमध्ये दोन ते तीन वेळेस मुदतवाढ देऊन सुद्धा लाखो महिलांनी केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही त्यातच 30 एप्रिल 2026 ची शेवटची मुदत वाढ दिली होती त्यानंतर आता जवळपास 65 लाख महिला ह्या योजनेतून अपात्र झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारला बजेटमध्ये फरक
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला 45 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रति महिन्याला खर्च लागत होता. त्यानंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लाखो महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत नंतर राज्य सरकारला प्रति महिना लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी फक्त 36 हजार कोटी रुपयांचा अनुदान लागत होतं.
आता केवायसी प्रक्रिया आल्यावर जवळपास या योजनेतून 65 लाख महिला बाद झालेल्या आहेत त्यामुळे आता राज्य सरकारला प्रति महिना लाभार्थी महिलांना हप्ता पंधराशे रुपये देण्यासाठी फक्त 36000 कोटी पेक्षा सुद्धा कमी खर्च येणार आहे.

अपात्र महिलांकडून वसुली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासून ज्या महिला लाभ घेत होत्या परंतु त्या महिला अपात्र असून सुद्धा या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे परंतु राज्य सरकार त्या महिलांकडून हप्त्याची वसुली करणार आहे.
म्हणजेच ज्या महिला केवायसी मध्ये अपात्र झालेले आहेत आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये सुद्धा अपात्र झालेले आहेत आणि ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता महिला व बालविकास विभाग आणि राज्य सरकार त्या महिलांकडून जो लाभ घेतलेला आहे तो लाभ परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार
मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि या योजनेमध्ये त्या महिला सुरुवातीपासून लाभ घेत आहेत अशाच महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला होता आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही बाकी होती किंवा ज्याची प्रक्रिया दुरुस्ती करायची होती अशा महिलांची किंवा अशी प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या महिलांची यादी विभागाकडे प्राप्त झाल्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या रखडलेला हप्ता हा एकत्रितपणे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केले जातील.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.