Ladki Bahin Yojana February March Hapta Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेमधील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयाची रक्कम दिली जाते. या योजनेअंतर्गत ज्या आपण लाभार्थी महिला आहेत त्या महिलांना आतापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंतचे वितरण पूर्णपणे झालेले आहे.
योजनेमध्ये काही महिन्यापासून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केवायसी बंधनकारक केलेली आहे त्यामध्ये जवळपास एक कोटी ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही लाखो महिलांची केवायसी अपूर्ण आहे. आता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला होता. सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana February March Hapta Update

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

केवायसी पात्र महिलांची यादी
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांना सुरळीतपणे हप्ते वितरित होत आहेत. केवायसी पात्र महिलांची यादी ही विभागीय कार्यालयामध्ये आल्यानंतर त्या महिलांना चालू हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे आणि ज्या महिलांचे किंवा केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती आहे अशा महिलांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. ज्या महिला केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर त्यांना पात्र लाभार्थी म्हणून त्यांना मागील आणि चालू महिन्याचे थकित हप्ते एकत्रित येण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित
लाडकी बहिण योजनेचा मागच्या अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवर जात आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही मार्च महिन्याचे 17 दिवस ओलांडून सुद्धा लाभार्थी महिलांना हप्ता मिळालेला नाही.
मागील काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत होता त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना आतापर्यंत पूर्ण हफ्ते म्हणजे जानेवारीपर्यंतचे पूर्ण हफ्ते प्राप्त झालेले आहेत अशाच महिलांना आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता आहे.

या महिलांचा लाभ होणार बंद
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे बंधनकारक केलेले आहे त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही अशा महिलांचे हप्ते देणे बंद होणार आहे कारण 31 मार्च 2026 ही शेवटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख आहे.
केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती असेल तर आपली केवायसी प्रक्रिया मधील चुका व्यवस्थित करून किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि पुढील हप्ते आणि थकित हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. ज्या महिलांना नोव्हेंबर पासून एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांची जर केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्या महिलांना एकत्रितपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रितपणे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्त्यासाठी 31 मार्चपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे असे मंत्री बावनकुळे यांनी प्रसार माध्यमातून बोलताना सांगितलं आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kyc portal chalu karavr desembar pasun hapta ala nahe new kyc plz
मला तर हे लाडकी बहीण योजना चे अजिबात कळत नाही कधी पैसे येतात कधी नाही येत दर महिन्याला kyc चे नाटक कधी पैसे 10 तारखेच्या आत येणार नाही बंद करा होत नसेल तर…
Nov& Dec month cha hafta nhi bheta ahe .
Ani dayrect jan che fakth 1500/- mg nov, Dec,ani feb ,march asel sarv hafte ekatra yenar na