Ladki Bahin Yojana Beneficiary Check
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पात्रता निश्चित करताना सरकारने काही महत्त्वाचे निकष सुरुवातीपासून ठरवले होते ज्यामध्ये गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकडे विशेष लक्ष राज्य सरकारने दिले होते परंतु या लाडकी बहिण योजनेमध्ये खूप सारे गैरप्रकार निदर्शनास आल्यामुळे आता राज्य सरकारला हे अर्जाच्या पडताळणीचे पाऊल उचलावे लागले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरवले होते त्यामध्ये महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक होते त्यामध्ये ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे याशिवाय अर्जदार महिलेचे आधार लिंक हे स्वतःच्या बँक खात्याशी असणे आवश्यक आहे आणि ती महिला दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणारे नसावी असे काही निकष व अटी राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच लावलेले होते.(Ladki Bahin Yojana Beneficiary Check)

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

एवढ्या जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये सध्या जोरामध्ये चालू असलेली लाडकी बहिण योजनेमधील अर्जाची पडताळणी प्रक्रिया त्यामध्ये जवळपास 26 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र होण्याच्या वाटेवर आहेत त्यामध्ये काही जिल्ह्यातील महिलांच्या अर्जाची चौकशी होणार आहे. 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडून तयार करण्यात आलेली आहे आणि या विभागाकडून अंगणवाडी सेविकाच्या मार्फत या 26 लाख महिलांच्या अर्जातून अपात्र महिलांची यादी वेगळी करण्यात येणार आहे.
जुलै महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आला आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास हजारो महिलांचे अर्ज राज्य सरकारने थकीत करून ठेवले आहेत त्यामुळे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या सर्व महिलांची अर्जाची पूर्णपणे चौकशी होईल तेव्हाच त्यांना जुलै महिन्याचा हप्ता येईल पण जर त्या महिला या चौकशीमध्ये पात्र होतील तर नाही तर त्या महिलेला योजनेतून अपात्र घोषित करण्यात येईल.

या जिल्ह्यातील एवढ्या महिलांची चौकशी होणार
1 . यवतमाळ जिल्हा
लाभार्थी महिला – 6 लाख 92 हाजर 563
चौकशी – 49 हजार 735
2 . नागपूर जिल्हा
लाभार्थी महिला – 5 लाख 19 हजार 267
चौकशी – 95 हजार 400
3 . अकोला जिल्हा
लाभार्थी महिला – 5 लाख 37 हजार 554
चौकशी – 28 हजार 875
4 . बुलढाणा जिल्हा
लाभार्थी महिला – 3 लाख 2 हजार 111
चौकशी – 17 हजार
5 . अमरावती जिल्हा
लाभार्थी महिला – 6 लाख 78 हजार
चौकशी – 59 हजार 837
6 . वाशिम जिल्हा
लाभार्थी महिला – 3 लाख 21 हजार 147
चौकशी – 31 हजार 627
7 . जळगाव जिल्हा
लाभार्थी महिला – 10 लाख 35 हजार
चौकशी – 92 हजार
8 . नंदुरबार जिल्हा
लाभार्थी महिला – 4 लाख 22 हजार 578
चौकशी – 52 हजार 994
9 . अहिल्यानगर जिल्हा
लाभार्थी महिला – 11 लाख 26 हजार 652
चौकशी – 1 लाख 25 हजार
10 . धुळे जिल्हा
लाभार्थी महिला – 5 लाख 40 हजार 381
चौकशी – 73 हजार 258
11 . चंद्रपूर जिल्हा
लाभार्थी महिला – 4 लाख 92 हजार 953
चौकशी – 26 हजार 122
12 . नाशिक जिल्हा
लाभार्थी महिला – 15 लाख 35 हजार 447
चौकशी – 1 लाख 50 हजार
13. वर्धा जिल्हा
लाभार्थी महिला – 3 लाख 11 हजार 566
चौकशी – 21 हजार 89
14 . गडचिरोली जिल्हा
लाभार्थी महिला – 2 लाख 61 हजार 157
चौकशी – 19 हजार 703
15 . गोंदिया जिल्हा
लाभार्थी महिला – 3 लाख 12 हजार 220
चौकशी – 33 हजार 364
16 . भंडारा जिल्हा
लाभार्थी महिला – 2 लाख 82 हजार 838
चौकशी – 22 हजार

FAQ
1 . मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा.
- अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल. - लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. - योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे. - मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
https://mahagov.in किंवा MahaDBT पोर्टल

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala 2 mahinyache paise nahi aale
Sir madam
Please mala nahi ala 1500 check kara
Sir , Maam mujhe bhi 2 Mahine see ladki bahin yojna ke paise nahi aaye