Ladki Bahin Yojana Yavatmal Municipal Corporation
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सर्वीकड़े आता चर्चा चालू आहे ती अर्जाची पडताळणी प्रक्रियेची आणि या योजनेमध्ये खूप सारे गैरप्रकार घडत आले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये लाखो महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत मागील काही दिवसांमध्ये 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत आणि अर्ज पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील किती महिला अपात्र करण्यात आल्या आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin.maharashtra.gov.in list
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

यवतमाळ जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडे गैरप्रकार उघडकीस येत आहेत आणि या योजनेचा खूप लोकांनी महिलांचा नावे अर्ज करून या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी केली असता त्यामध्ये 49,735 महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 49,735 महिलाचे त्यांचे अर्ज हे थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत त्यांची जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या सर्व लाभार्थी महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही. महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी विशाल जाधव यांनी याबद्दल याबाबत माहिती दिलेली आहे या मध्ये सर्व अर्जाची पडताळणी करून महिला पात्र होतील त्यांना पुढे हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र होतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.

अंगणवाडी सेविका कडून विचारले जाणारे प्रश्न
यवतमाळ जिल्ह्यात सध्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे आणि ही प्रत्येक अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्यासाठी आदेश दिलेली आहे त्यामुळे आता या अंगणवाडी सेविका योजनेचा लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत.
अंगणवाडी सेविका कडून विचारले जाणारे प्रश्न हे लाडकी बहिण योजनेच्या सुरुवातीला जे निकष ठरवले होते त्यातीलच प्रश्न असणार आहेत ते खालील प्रमाणे दिले आहेत.
- तुमच्या घरी चार चाकी वाहन आहे का?
जर लाभार्थी महिलेच्या घरी कोणतेही चार चाकी वहान असेल तर त्या महिलेला योजनेतून अपात्र करण्यात येईल. ट्रॅक्टर असेल तर ती महिलेला पात्र असेल
- 2 . दुसरा प्रश्न तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरदाता आहे का?
- जर लाभार्थी महिलेचा कुटुंबामध्ये कोणी जर व्यक्ती आयकरदाता असेल तर त्या महिलेला या योजनेतून आपत्र करण्यात येईल.
- 3 . तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा किती महिलांनी फॉर्म भरला आहे
- लाडकी बहीण योजनेमध्ये जर एकाच कुटुंबातील दोन महिलांनी अर्ज केला असेल तर त्यामध्ये फक्त एकच महिला पात्र असेल दुसरी महिला अपात्र होईल.
- 4 . तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का?
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र ठरू शकते.
- 5 . तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का?
- ज लाभार्थी महिला बाहेर राज्यातील रहिवासी असेल तर त्या महिलेला या योजनेतून अपात्र करण्यात येईल.
वरील दिलेले सर्व प्रश्न आणि अजून काही निकष ठरवल्याप्रमाणे यामध्ये जर कोणतीही महिला अपात्र ठरत असेल तर त्या महिलेला यापुढे हप्ते मिळणार नाही आणि ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांना कडून पार पाडण्यात येईल आणि अंगणवाडी सेविका त्या महिलेचा अर्ज लाडकी बहिण योजनेतून बाद करतील.

या पडताळणी प्रक्रियेमुळे काय फायदा होईल
लाडकी बहिण योजनेमध्ये पडताळणी प्रक्रिया जोराने चालू आहे सर्व जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन सर्व अर्जाची पडताळणी करत आहेत त्यामुळे या योजनेतील खऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल आणि ज्या महिलांना गरज आहे आणि ज्या महिला या लडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे निकषांमध्ये राहून लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेचा भरपूर फायदा होईल.(Ladki Bahin Yojana )
खूप जिल्ह्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा खूप जिल्ह्यामध्ये गैरवापर झालेला आहे यामध्ये काही दिवस अगोदर 14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावावर अर्ज करून या योजनेचा 12 हप्त्याचा प्रत्येकी लाभ घेतलेला आहे त्यामुळे राज्य सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे आणि खर्च पण जास्त लागला आहे. या योजनेमध्ये जवळपास 50 लाखाच्या जवळपास महिला अपात्र करण्यात आलेले आहेत या सर्व महिलांचा विविध कारणामुळे आणि लडकी बहिण योजनेच्या निकषेच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेमध्ये फक्त 2 कोटी महिला पात्र आहेत यामुळे राज्य सरकारला अर्थ खात्यातून निधी मध्ये थोडा फरक पडणार आहे.

जुलै महिन्याचा हप्ता Jully Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी पासूनच वितरण सुरुवात होणार आहे त्यामुळे आजपासून कधी पण पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये डीबीटी च्या मार्फत जमा होणार आहेत.
सध्या काही महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे ज्या महिला जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असतील आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बरोबर बसत असतील त्याच महिलांना जुलै महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे.
FAQ
. 1 . लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होतो?
साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता खात्यात जमा होतो.
- माझं उत्पन्न २.६ लाख आहे, मी अर्ज करू शकतो का?
नाही. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २.५ लाख असल्याने तुमचं अर्ज अपात्र ठरेल. - चारचाकी गाडी नवऱ्याच्या नावावर आहे, तरी मी पात्र आहे का?
गाडी कुटुंबाच्या नावावर असल्यास पात्रतेवर परिणाम होतो. तपशीलवार माहिती सेतू केंद्रात मिळेल. - माझं बँक खाते आधारशी लिंक नाही, तरी हप्ता मिळेल का?
नाही. खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
माझे नाव सविता गोरखनाथ पाटील आहे..मला मेरे ऑक्टोंबर महिना पैसे आले नाहीत….मी केवाईसी पण केली….तरीक पैसे कधी जमा होती……आमच्याकडे चारचाकी वाहन नाही……
Honar lavkar