Solapur Municipal Corporation 1 lakh Mahila Apatra list Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची महिलांसाठी सर्वात मोठी योजना बनलेली आहे या योजनेमध्ये गरीब आणि गरजू महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. लाडकी बहीण योजनेची सुरुवात जून 2024 मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत या योजनेमध्ये 10 हप्त्याचे वितरण पूर्णपणे वितरीत झाले आहे. आता प्रतीक्षा आहे ती अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी येईल त्याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये पहिले तीन हप्ते सर्व महिलांना आले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रियेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामध्ये लाखो महिला अपात्र झाले आहेत आता नवीन अपडेट अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या आहेत त्याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेऊया.
ladki bahin.maharashtra.gov.in list
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये डिसेंबर नंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर महिला व बाल विकास विभागाने या योजनेत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलांच्या अर्जाची निकषाद्वारे फेर तपासणी करण्यात सुरुवात केली होती त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 9 लाख महिला ह्या अपात्र झाल्या होत्या.
लाडकी बहीण योजनेच्या निकषाद्वारे ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यामुळे अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यामध्ये ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते तसेच ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत त्या महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका विभागीय अधिकारी यांनी लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन चार चाकी वाहनाची चौकशी करून ज्या महिला अपात्र झाल्या त्या महिलांना या योजनेतून समोरील लाभ मिळालेला नाहीये. आता पण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेता येते त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी चालूच असल्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातील एक नवीन अपडेट आलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक लाख महिला अपात्र झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख महिला अपात्र झाल्या
लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक जिल्ह्यातील लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका ह्या ह्या लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन पूर्ण निकषाचे पडताळणी करत आहेत जर लाडक्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 9 लाख 10 हजार महिलांनी लाडकी बहीण योजना साठी अर्ज केले होते आणि त्या महिला सुरुवातीला पात्र पण झाल्या होत्या परंतु जेव्हा निवडणुकी नंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील 15000 महिला ह्या त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 30 ते 40 हजार महिला ह्या संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ज्या महिला दोन सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना पण या योजनेचे वगळण्यात आले आहे. पडताळणी प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यातील पाहता जवळपास 1 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आता या एक लाख महिलांना मे महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मे महिन्याचा हप्ता 1500 कधी येईल
माझी लाडकी बहीण योजना मध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झाला एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन मे पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे परंतु आता मे महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आणि त्याबद्दल महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अपडेट मिळालेली नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागलेले आहे मे महिन्याचे 1500 रुपये हे याच महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.