Ladki Bahin Yojana February Hapta 1500 rupaye Release
Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेमधील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये दिला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 7 हप्त्याचे वाटप पण झालेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी योजना ठरली आहे या योजनेमध्ये च्या महिला या योजनेच्या नियमांमध्ये बसतात त्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये चा लाभ दिला जातो. त्यामध्ये आतापर्यंत राज्यामध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत परंतु काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.राज्य सरकारकडून अधिकृतपणे 9 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत. फेब्रुवारीच्या आठव्या हफ्ताचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत परंतु आता प्रतीक्षा संपली आहे, त्याबद्दलआपण याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती पाहूया.

Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि कोणत्या अपात्र
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियमानुसार दरवर्षी जून महिन्यामध्ये सर्व महिलांना ही केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र ठेवण्यात येणार आहे तसेच कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे आणि ज्या महिलांचे आधार कार्ड हे योजनेची लिंक नसेल तर त्या महिलांना सुद्धा योजनेतून वगळण्यात येणार आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतील त्याच महिला ह्या पुढे लाभ मिळेल आणि या योजनेमध्ये पात्र असतील.

Majhi Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीला 8 मार्चला फेब्रुवारीचा हप्ता -अदिती तटकरे
महाराष्ट्र राज्यात आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला म्हणजेच राज्यातील आर्थिक बजेटला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राची लोकप्रिय योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचे निधी प्राप्त होणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री आवृत्ती तटकरे यांनी सांगितलेले आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गेल्या असताना त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मुद्द्यावर त्यावर निर्णय झाले त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाची बोलताना सांगितले आणि त्यांचा क्स पोस्टवर पण स्पष्टपणे सांगितले आहे की फेब्रुवारीचा आठवा हप्ता 1500 रुपये हा ‘जागतिक महिला दिनाच्या’ दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च चा हप्ता हे दोन्ही मिळून 3000 रुपये हे 8 मार्च रोजी वितरित होतील आणि त्यासाठी लागणारा निधी हा दोन दिवसांमध्ये विभागाकडे जमा करण्यात येईल असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी केलेली पोस्ट पण पाहू शकता.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.