Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील 16000 महिलांचे आधार लिंक नहिय ? पहा पूर्ण माहिती

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana online

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये प्रतिमाह 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळतो. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंतचे वितरण झालेले आहे यामध्ये सर्व लाभार्थी महिलांना 9 हप्त्याचे पैसे पण त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. माझी लाडकी बहीण mazi ladki bahin yojana योजनेमध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये जमा करण्यात आले होते.

Ladki Bahin  Yojana

परंतु निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेमध्ये काही निकषाचे पालन करण्यास सुरुवात केली त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महिला अपात्र ठरल्या आहेत. या योजनेमध्ये 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यामध्ये जानेवारी मंथ अखेरीस दोन कोटी 51 लाख महिलांच्या बँक खात्यात 7 हप्त्याचे वितरण पण झाले होते त्यानंतर जानेवारीपासून सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केले त्यामध्ये 10 लाख महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत आणि अर्जाची छाननी प्रक्रिया अजूनही चालूच असल्यामुळे नेमक्या किती महिला या योजनेमध्ये अपात्र होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Majhi Ladki Bahin Yojana फेब्रुवारी मध्ये चार लाख महिला अपात्र

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनायामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 2 दोन कोटी 46 लाख महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आल्या होत्या त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 लाख महिला अपात्र करण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाने लडकी बहीण योजनेतील निकषाची अंमलबजावणी करताना महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये महिलांच्या घरी चार चाकी वाहने किंवा कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असलेले अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते.

Majhi Ladki Bahin Yojana

राज्य सरकारने सर्व अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती, त्यामध्ये खूप महिलांच्या घरी चार चाकी वाहने आढळून आले त्यामुळे त्या महिला या योजनेतून अपात्र करण्यात आले आहेत तसेच आता फेब्रुवारी आणि मार्च हफ्ता 3000 रुपये एकत्रितपणे ८ मार्च रोजी वितरित करण्यात आला होता त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यामध्ये किती महिला या अपात्र होतील याकडे लक्ष लागले आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Pune Municipal Corporation पुणे जिल्ह्यातील अजुन 16 हजार महिला अपात्र होतील

पुणे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही 21 लाखापेक्षा जास्त होती त्यानंतर जानेवारीपासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली असता त्यामध्ये खूप महिला या अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 80 हजार महिला या अपात्र ठरल्या होत्या त्यानंतर आता अर्जाची प्रक्रिया सुरूच असताना अजून एक बाब निदर्शनास आली आहे की लाडकी बहीण योजनेमधील 16000 महिला या त्यांच्या अर्जामध्ये त्यांचे आधार कार्ड लिंक नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 16 हजार महिलांचे आधार कार्ड बँकेची लिंक नाहीये किंवा त्यांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबरची लिंक नसल्यामुळे त्यांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येईल असा प्रश्न निर्माण होत आहे. लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यामध्ये पुणे जिल्हामधील Pune Municipal Corporation सर्वात जास्त महिलांची संख्या आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana online

लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली होती ही प्रक्रिया अजूनही कार्यरत असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मार्फत सर्व लाडक्या बहिणींचे अर्जाची फेर तपासणी चालू आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 16 हजार महिलाचे आधार कार्ड लिंक नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील अपात्र महिलांचा आकडा हा वाढू शकतो.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील 16000 महिलांचे आधार लिंक नहिय ? पहा पूर्ण माहिती”

Leave a Comment