Ladki Bahin Yojana Online Apply Form Kasa Bharava | ‘नारी शक्ती दूत’ ॲपमधुन अर्ज घरबसल्या भरा |

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

mazi ladki bahin yojana online form kasa bharava

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणा केली. योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना देण्याचे निर्धार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. ही घोषणा होताच सरकारी कार्यालय व सेतू केंद्रात महिलांची एकच गर्दी बघायला मिळाली, ही गर्दी कमी करण्या साठी महाराष्ट्रतील शिंदे सरकारने ऑनलाईन लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर लॉन्च केलेला आहे. तरी सरकारने सर्व महिलांना या ॲपद्वारे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरावा ही विनंती केली आहे, तर आपण बघूया की कसा आपण घरबसल्या नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड करून आपण आपला अर्ज घरबसल्या करू शकता.

नारी शक्ती दूत ॲप मघून घरबसल्या करा अर्ज| mazi ladki bahin yojana online form kasa bharava

नारी शक्ती दूत ॲप मघून घरबसल्या करा अर्ज| mazi ladki bahin yojana online form kasa bharava
  1. सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करायचा आहे.
  2. नारीशक्ती दूत ॲप ओपन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी देऊन टर्म अँड कंडिशन वर क्लिक करून लॉगिन करायचं आहे.
  3. तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीच्या प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट सदस्य, गृहणी आणि ग्रामसेवक या गोष्टी भरून आपला प्रोफाइल आपण अपडेट करायचा आहे.
  4. नारी शक्ती दूत ॲप मध्ये लॉगिन केल्यावर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्याय दिसेल तो निवडायचे आहे.
  5. नारी शक्ती दूत ॲप ला लोकेशनची परमिशन द्यायची आहे.
  6. नंतर तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या अर्ज येईल.
  7. लडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये आपल्याला आधार कार्ड प्रमाणे आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, आधार कार्ड क्रमांक व तुम्ही शासनाच्या कोणत्याही अतिरिक्त योजनेचा लाभ घेतला असेल याची सविस्तर माहिती भरायची आहे.
  8. तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण नाही या पर्यायावर क्लिक करा .
  9. वैवाहिक स्थिती काय त्याच्याबद्दल माहिती टाका.
  10. लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा तुमच्या जन्म पर प्रांतात किंवा महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यात जन्म झाला असेल तर नाही किंवा हो या पर्यायावर क्लिक करा.
  11. त्यानंतर ज्या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत.
  12. कागदपत्रे मध्ये आपल्याला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचे दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, अर्जदाराचे हमी पत्र, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे आपल्याला लाडकी बहीण योजना यामध्ये अपलोड करायची आहे.
  13. हे सर्व प्रक्रिया झाल्यावर अर्जदार महिलांनी आपला फोटो काढून ई केवायसी करायची आहे आणि एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचे आहे.
  14. त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली सर्व कागदपत्रे एकदा तपासून त्यानंतर खात्री करूनच तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे आता एक ओटीपी नंबर आपण व्हेरिफाय करून घ्या.
  15. अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरल्या मोबाईल मध्ये भरू शकता.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana Online Apply Form Kasa Bharava | ‘नारी शक्ती दूत’ ॲपमधुन अर्ज घरबसल्या भरा |”

Leave a Comment