Ladki Bahin Yojana Reject List :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. मागील वर्षी 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती आणि पात्र महिलांना जुलै 2024 पासून दरम्यान 1500 रुपयांचा लाभ देण्यात आला होता तेव्हापासून आतापर्यंत लाडकी बहिण योजनेमध्ये 13 हप्त्याचे विचाराने हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँकाच्या मध्ये जमा झाले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार सर्व महिलांच्या बँकांच्या मध्ये मागील वर्षी सरसकट 1500 रुपये दरम्यान देण्यात आला परंतु विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेची अर्जदार महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवले होते त्यांनी निककशाच्या बाहेर जाऊन ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पण अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालूच आहे. 1183 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया .(Ladki Bahin Yojana Reject List )

Ladki Bahin Yojana Maharastra Apply Online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

1183 सरकारी कर्मचारी महिला
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत खूप गैरप्रकार दिसून आलेले आहेत त्यातच 1183 महिला कर्मचारी महिलांनी या योजनेच्या लाभ घेतलेल्या आहे.
जिल्हा परिषद शाळेतील सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभ घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. सरकारी नोकरी वरती कार्यालयात असलेल्या महिलांना सातव्या वेतन आयोग लागू असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाभ पण या महिलांनी घेतलेला आहे त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यावर आता कारवाई करणार आहे.1183 महिलां कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास खात्याकडे आताच ग्राम विकास खात्याकडे पाठवले त्या नंतर ग्रामविकास विभागाने या संदर्भातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रक काढून योजनेचा गैरफायदा घेऊन पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करावी अशी निर्देश ग्राम विकास खात्याने सर्व जिल्हा परिषद शाळेच्या CEO दिलेले आहेत. या सर्व सहकारी कर्मचाऱ्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलेले हप्त्याची पूर्ण रक्कम ही 2247700 एवढी आहे या सर्व रकमेच्या राज्य सरकारला खूप मोठा फटका बसला आहे.

14000 पुरुषांनी सुद्धा लाभ घेतला
लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार थांबण्याचे का नाव घेत नाही या योजनेतील लाभार्थी महिलांचे छाननी प्रक्रिया सुरू असताना त्यातील धक्कादाय प्रकार असा पण घडला होता की 14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज दाखल करून या योजनेचा एक वर्षापासून लाभ पूर्णपणे घेतलेला आहे.
मागील महिन्यामध्ये 14 हजार पेक्षा अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतल्याचे आढळून आले या पुरुषांनी सुमारे एक वर्ष पूर्णपणे या योजनेचा प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे लाभ घेतला आहे आणि आता राज्य सरकार ह्या 14 हजार पुरुषावरती पण कारवाई करून त्यांच्याकडून पूर्ण पणे रक्कम वसूल करून घेणार आहे.

Ladki Bahin Yojana चौकशी मधील महिला
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची चौकशी प्रक्रिया सुरू आहे त्यातील जवळपास मागील महिन्यामध्ये 26 लाख महिलांचे अर्ज हे जून आणि जुलै महिन्यामध्ये हप्त्याच्या वेळेस थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत. जुन मध्ये जवळपास हजार महिलांची अर्ज हे थकित आहेत त्यांना जुनचा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही तसेच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती देण्यात आला पण तू जुलै महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस 26 लाख महिलांचे अर्ज हे अजून पण चौकशीसाठी पात्र आहेत जोपर्यंत त्यांचे पूर्णपणे चौकशी होणार नाही त्यातील पात्र महिला वेगळ्या आणि अपात्र महिलांची यादी वेगळी करून महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल तेव्हाच त्यातील पात्र महिलांनाच ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळेल आणि ज्या महिला अपात्र होतील त्या महिलांना योजनेतून बाद करण्यात येईल आणि यापुढे कधीही त्यांना लाभ मिळणार नाही.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.