Ladki Bahin Yojana If you have a four-wheeler, your application will be rejected.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये चालवली जाणारी सर्व महत्वकांक्षी योजना ठरली आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळत आहे . ज्या लाभार्थी महिलांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उदेशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलैपासून ते जानेवारी पर्यंत 7 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे प्रतिमाह त्यांच्या बँक खात्यामध्ये 10500 रुपये जमा झालेले आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योजनेच्या हप्ता 1500 रुपयांचा हप्ता हा 2100 रुपये करू असे आश्वासन दिले होते. आता 2100 रुपयाचा हप्ता हा राज्याच्या अर्थसंकल्पानंतर म्हणजेच मार्च महीन्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले होते त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अर्थ खात्याला किंवा अर्थव्यवस्थेवर ताण पडू नये म्हणून लाडकी बहिण योजनेमधिल ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या आहेत आशा महिलांना आता वगळण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana अंगणवाडी सेविकांना दिले आदेश फाडून
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये आता अर्जाची पडताळणी करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने आदेश दिलेले आहेत ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचा सर्वे होणार आहे त्यामध्ये काही विभागाचे कर्मचारी , अंगणवाडी सेविका यांच्याकडून त्या लाडकी बहिण योजनेतील महिला या योजनेचा लाभ घेता त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे का हे बघणार आहेत.
अंगणवाडी सेविका कडून लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन पूर्ण फेर तपासणी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी वाहन असेल त्या लाडक्या बहिणीला लगेच अपात्र करण्यात येणार आहे. नंतर त्यांना यानंतरचा लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana सरकारच्या तिजोरीवर ताण
लाडकी बहीण योजनांमध्ये लाभार्थी महिलांची संख्या आतापर्यंत 2 कोटी 50 लाख पेक्षाही जास्त झालेले आहे. त्यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची संख्या ही अंदाजे 30 लाखांपर्यंत असल्याची सरकारला असा अंदाज आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांना योजनेतून कमी करण्याचा महिला बाल विकास विभागाचा प्रयत्न आहे. त्यामध्ये महायुती सरकारने 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये केलेले आहे. त्यामुळे आता हे 2100 रुपये अर्थसंकल्पानंतर महिलांना मिळणार आहेत त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर खूप ताण पडण्याची शक्यता आहे म्हणून ज्या महिला खरंच गरजू आणि गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही अर्जाची पडताळणी करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना महाराष्ट्र पात्रता
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य
- वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी
- कुटुंब आयकर भरत नसावे
- .चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे
- इतर कोणत्याही सरकारी योजनेतून १५०० रुपयांपेक्षा जास्त मदत मिळत नसावी
- बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
Ladki Bahin Yojana चारचाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज बाद होइल
लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असणे आता महागात पडणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार आहे. येत्या दोन दिवसांत अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन बहिणींकडील चारचाकी वाहनांची शहानिशा केली जाऊन लाभ ठेवायचा की रद्द करायचा हे सर्व्हेनंतर निश्चित केले जाणार आहे.
राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना सुरुच ठेवण्याच्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. मात्र, आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु या योजनेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांना सोमवारी विविध सूचना दिल्या. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या घरी जावे लागणार आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.