लाडकी बहीण योजना : Form ‘Edit’ Kasa Karaycha | लाडकी बहीण योजनेचा अर्ज ‘एडिट’ करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Table of Contents

Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava 2024

mazi ladki bahin yojana online form Edit: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे.राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.


तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म नारीशक्ती दूध या ॲप म्हणून भरला असेल त्यासाठी शासनाकडून नवीन अपडेट आली आहे तुम्ही नारीशक्ती दूत ॲप मध्ये लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये काही चूक असेल नावामध्ये बदल असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही चुका असेल बँकेचे डिटेल्स चूकीची टाकलेल्या किंवा तर त्यासाठी शासनाने नवीन चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने नव्या एडिटचे ऑप्शन तिथे दिलेला आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये काही चुका केला असेल तर त्या चुका तुम्ही आता दुरुस्त करू शकता हा फॉर्म कशा प्रमाणे आपण एडिट करू शकता हे आपल्याला या पोस्टमध्ये सर्व माहिती मिळेल तर हे पोस्ट अखेरपर्यंत वाचण्याची कृपा करावी.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Correction Durusti

  • सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअर वर जाऊन नारी शक्ती दूत हे नाव टाकून हा ॲप डाऊनलोड करून अपडेट करायचा आहे.
Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava
  • नंतरच्या मोबाईल नंबर ने आपण लाडकी बहीण योजना च्या ऑनलाईन फॉर्म नारीशक्ती दूत ॲप मधून भरलाय त्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून ओटीपी टाकून वेरिफाय करायचा आहे.
Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava
  • नंतर तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही आपला लाडकी बहीण योजनांचा अर्ज बघू शकता.
Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava
  • लाडकी बहीण योजनेच्या अर्ज एडिट करण्यासाठी आपल्याला आपल्या अर्जावर क्लिक करून आपल्याला उजव्या हातावर सगळ्यात वर एडिट ऑप्शन दिसेल.
  • एडिट बटन वर क्लिक केल्यावर आपण भरलेला अर्ज फक्त एकदा एडिट करू शकता.
Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava
  • एडिट बटन वर ओके केल्यानंतर आपल्याला संपूर्ण फॉर्म एडिट करता येईल आपण जे काही चूक केली असेल ते दुरुस्त करून आपण हा फॉर्म नंतर सेव करू शकता.
  • आपल्याला सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणे लिहायची आहे, आधार कार्ड प्रमाणे तुमच्या नाव, गाव, तालुका, जिल्हा नाव, जन्मतारीख टाकायचा आहे, दुरुस्त माहिती करून आपल्याला अर्ज ओके करायचा आहे.
Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava
  • आपण अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असेल ते पण आपण एडिट मध्ये जाऊन डिलीट करून नवीन कागदपत्रे अपलोड करू शकता.
  • सर्व माहिती खात्री पूर्ण केल्यानंतर आपण सर्वात खाली माहिती अपडेट करा या ऑप्शन वर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे, नंतर ओटीपी आल्यावर व्हेरिफाय ओटीपी करून आपला फॉर्म सबमिट होऊन जाणार.

Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava

अशाप्रमाणे आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नारीशक्ती दूत यामध्ये पूर्ण एडिट करून आपला चुका दुरुस्त करू शकतात.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “लाडकी बहीण योजना : Form ‘Edit’ Kasa Karaycha | लाडकी बहीण योजनेचा अर्ज ‘एडिट’ करा”

Leave a Comment