Ladki Bahin Yojana ekyc Online Apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिला सक्षमीकरणासाठी प्रमुख योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते.
या योजनेत 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये काही लाभार्थ्यांनी नियमांच्या बाहेर जाऊन, या योजनेचा लाभ घेतला.
या योजनेचा लाभ योग्य व्यक्तीला मिळावा यासाठी आता राज्य शासनाने व महिला बाल विकास विभागाने सर्व पात्र लाभार्थी महिलांची EKYC करण्याची प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे अनेक महिलांना अडचण येत असून ओटीपी न येणे, उशिरा येणे, Error येणे, साईटवर लोड येणे यासारखे अनेक समस्यांना समोर जावे लागते त्यामुळे लाभार्थी महिलांना ई केवायसी करतांनी मनस्ताप होत आहे, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी यशस्वीरित्या 5 मिनिटात कशी करायची याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
eKYC करताना येणाऱ्या समस्या वर उपाय | Ladki Bahin Yojana ekyc Error Problem

OTP Problem: ई केवायसी करताना महिलांना ओटीपी ची समस्या येत आहे, महिलांना ओटीपी न येणे, ओटीपी आल्यानंतर सबमिट न होणे सारख्या समस्या येत आहे.
उपाय – लाडकी बहीण योजनेत EKYC करताना जर तुम्हाला वरील समस्या येत आहे, तर EKYC सर्व लाभार्थी एकाच वेळी प्रयत्न करत असल्यामुळे अधिकृत वेबसाईटवर लोड येत आहेत.
यामुळे ओटीपी येण्यास विलंब होतो किंवा साईट क्रॅश होत आहे, यावर उपाय म्हणून लाभार्थ्यांनी रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 ते 6 या वेळेस EKYC करण्याचा सल्ला दिला जात आहे, यावेळेस साइटवर लोड कमी असतो त्यामुळे EKYC जलद प्रक्रिया होते आणि Ekyc होण्यास कमी कालावधी लागेल.
बँकेचे खाते तपासणी -:
eKYC करताना तुमची बँक खाते आधार कार्ड लिंक आहे की नाही हे अगोदर अचूकपणे तपासावे याची खात्री करा.
अर्जाची स्थिती तपासा:– लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योजनेच्या अधिकृत साइटवर जाऊन तुमच्या अर्जाची तपासणी करा. तर सर्वात आधी तुमच्या अर्जाची मंजूर स्थिती तपासा.
eKYC करण्याची प्रक्रिया | Ladki Bahin Yojana eKYC Process

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (eKYC) कशी करावी (मोबाईलवरून) Ladki Bahin Yojana ekyc Online Mobile
- ई-केवायसी सुरू करण्याची प्रक्रिया:

तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून ladkibahine.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर Website दिसणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार क्रमांक टाका:
नवीन पेजवर, ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक Aadhar Card Number टाका.
दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि “मी सहमत आहे” या पर्यायावर टिक करा.”ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.
- ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन:
लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक aadhar card link असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल .
तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक:

आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल, तर पतीचा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा Captcha भरा, “मी सहमत आहे” वर टिक करा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा..
पती किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी OTP Submit टाकून सबमिट करा.
(टीप: ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पर्याय आल्यास आपल्याला माहीत उपलब्ध करून देण्यात येणार)
- जातीचा प्रवर्ग निवडा:
आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (कॅटेगरी) निवडायचा आहे, जसे की SC, ST, OBC, VJ (A), NT (B), NT (C), NT (D), SBC किंवा Open/General.
- डिक्लेरेशन (घोषणा) आणि माहितीची पडताळणी:
पहिला प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत.” या प्रश्नासाठी तुम्हाला ‘होय’ YES निवडायचे आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे.
दुसरा प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” हे एक डिक्लेरेशन Declaration आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा ‘होय’ YES निवडायचे आहे.
दोन्ही ठिकाण ‘होय’ YES निवडल्यानंतर, दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल, यावर टिक करून “सबमिट करा” Submit बटणावर क्लिक करा.
- ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण:
“तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल, याचा अर्थ तुमची केवायसी झाली आहे.

- केवायसी झाली आहे की नाही, हे कसे तपासावे?
त्याच वेबसाइटवर जाऊन लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाका .
“मी सहमत आहे” वर क्लिक करून “ओटीपी पाठवा” वर क्लिक केल्यास, “या आधार क्रमांकाची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
मुख्यमंत्री लाडकी बहीण पैसे मला नाही आले
योगिता रसाळ
मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे दोन महिन्यांचे पैसे आले नाहीत
Ekyc chi Portal open hot nahi aahe
मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे दोन महिन्यांचे पैसे आले नाहीत