Ladki Bahin Yojana Apatra Mahila list
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्ये आता आनंदाची बातमी आहे जून महिन्याचा हप्ता अधिकृतपणे येणार आहे याची घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया काही महिन्यापासून चालू आहे त्यामुळे या योजनेमध्ये हजारो महिला आता वगळण्याची शक्यता आहे राज्य सरकारने या योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिलावर आळा घालण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले होते. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया की कोणत्या महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुधारणा करणे आहे अनेक महिलांच्या कुटुंबामध्ये या योजनेमुळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर आणि घरातील खर्चावर पूर्णपणे या योजनेचा जो लाभ मिळतो त्यामध्ये उदरनिर्वाह होत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना बनली आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो आणि हाच लाभ पुढे चालून 2100 रुपये करण्याची घोषणा पण राज्य सरकारने दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेतील पात्रतेच्या अटी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये जुलै 2024 पासून सुरू झालेल्या योजनेमध्ये अगोदरच काही निकष आणि काही अटी राज्य शासनाने ठरवल्या होत्या त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिला आहे ती महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
आणि त्याच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे जेणेकरून ती महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणे गरजेचे आहे आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे निकष लावण्यात आला होता. या योजनेतील सर्वात मोठी आट म्हणजे अर्जदार महिलेच्या घरामध्ये कोणतेही चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळता जर असेल तर ती महिला या योजनेतून अपात्र असेल आमच्या महिलेच्या घरामध्ये कोणीही आयकर जाता व्यक्ती नसावा जर असेल तर ती महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे मानले जाते आणि त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्जाची पडताळणी प्रक्रिया आणि अपात्र महिला
महाराष्ट्र राज्यामधील लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीपासून सुरू केलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू आहे मागील दोन तीन महिन्यांमध्ये जवळपास दहा लाख महिला या योजनेतून अपात्र झालेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या निकषांमध्ये ज्या ज्या महिला बसत नव्हत्या किंवा नकाशाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

सरकारी अहवालानुसार अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिली आहे आणि योजनेच्या अटीचे उल्लंघन केले आहे तसेच काही महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील 75 हजार महिलांच्या नावे चार चाकी वाहने असल्याचे आढळून आले त्यामुळे या सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांच्या घरी आयकर जाता व्यक्ती असल्यामुळे त्या पण महिला या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत आणि काही कुटुंबामध्ये महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त असल्याचे पण आढळून आले असे सर्व निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या घेत असलेल्या महिलांना वगळण्यात येत आहे आणि आणि ही अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही पुढे पण चालू राहील. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची प्रत्यक्षपणे पडताळणी करत असतात त्यामुळे अजून किती महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत हे कालांतराने कळेल.
२१०० रुपयाचा लाभ या महिलांना मिळेल आणि कधीपासून
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये जवळपास 10 लाख महिलांना या योजनेतून आतापर्यंत वगळण्यात आलेले आहे त्यामुळे अजूनही खूप महिला आशा आहे की त्या लाडकी बहीण योजनेच्या निकषा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना वगळून लाडकी बहीण योजनेतील लाभ घेणाऱ्या 2 कोटी 41 लाख महिला पैकी जवळपास अजून महिलांचा आकडा हा कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना जो लाभ मिळत होता 1500 रुपये पात्र महिलांना 2100 रुपयांच्या स्वरूपामध्ये पुढे चालून मिळणार आहे. हे सर्व राज्यातील सरकार पुढे चालून करण्याचे उद्देश सरकारचा आहे.

अपात्र महिलांची यादी कशी चेक करायची
लाडकी बहीण योजनेमध्ये जर जर आपण अपात्र झालो आहोत याची यादी कशी पहायची त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल त्यामध्ये लॉगिन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील यादीमध्ये तुमचं नाव दिसेल या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ पुढे चालून पण घेऊ शकता म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात जर या यादीमध्ये तुमचे नाव नाही दिसले तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा मिळणार नाही आणि तुम्ही या योजनेमधून अपात्र झाला आहात.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.