Ladki Bahin Yojana Apatra Mahila List :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची महत्त्वकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेवर खूप टीका होत असतात विधानसभा निवडणुकीनंतर 4-5 हप्त्याचे वाटप पूर्ण झालेले आहे त्यामध्ये पण 9 लाख महिला काही कारणास्तव आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेत होत्या त्या सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास नऊ लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया आता पण चालू असल्यामुळे या अपात्र यादीमध्ये राज्य सरकारच्या जवळपास 41 लाख महिलांच्या आकडा असल्याचे समजते, आता पाहूया यामध्ये सविस्तर माहिती किती महिला आतापर्यंत अपात्र झाल्या आणि कोणत्या महिला अपात्र पुढे चालू होणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online )

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

योजनेचा लाभ किती महिलांना मिळत आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 लाख महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे आणि जवळपास 41 लाख महिला अजून पण या योजनेमध्ये अपात्र यादीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून जारी केलेले जे लाडकी बहीण योजना जे नियमाने निकष आहेत त्यामध्ये लाखो महिला या योजनेचा गलत वापर करत आहेत आणि या येण्याचा लाभ घेत आहेत त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये योजनेमध्ये फक्त 2 कोटी 37 लाख महिलांनाच लाभ मिळत आहे ,अगोदर हाच आकडा डिसेंबर किंवा विधानसभा निवडणुकी अगोदर या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांच्या आकडा 2 कोटी 47 लाख एवढा होता.

कोणत्या गोष्टींमुळे महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे
महाराष्ट्र राज्याची लाडकी बहिण योजनामध्ये महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या आत मध्ये असणे गरजेचे आहे परंतु काही महिलांचे वय हे 65 वर्षाच्या वर आढळून आले त्यामुळे काही महिला त्यामध्ये पण अपात्र झालेले आहेत.
लाडकी बहिण योजनेमध्ये काही दिवसापूर्वीच एक 2630 महिला ह्या सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होता असे निर्देशनास आले होते त्यामध्ये जवळपास 1 लाख 20 हजार महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया केल्यावरती 2630 महिला अपात्र करण्यात आलेले आहेत. काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा आणि लाडकी बहिण योजनेचा सुद्धा लाभ घेतायत अशा 2 लाख च्या जवळपास महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले होते.

निकषांमध्ये कोणत्या महिलांचे नाव आहे
लाडकी बहीण योजनामध्ये आतापर्यंत नऊ लाख महिलांचे नाव हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्यामध्ये ज्या महिला या महिलांचेबहिण योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे त्यांचे नाव कट करण्यात आले होते परंतु अजून 41 लाख महिला अशा आहेत त्या पुढे चालून या योजनेतून वगळण्यात येऊ शकतात त्यामध्ये कोणत्या महिला आहेत त्याबद्दल आपण खालील दिल्याप्रमाणे पाहूया.
1.ज्या महिला ह्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत तसेच संजय गांधी निराधार योजना मध्ये 2 लाख महिला आणि नमो शेतकरी योजनेमध्ये 7 लाख 70 हजार महिला आहेत.
2. सरकारी नोकरी करणारी महिला त्यामध्ये 2630 महिला या अगोदर अपात्र झाल्या होत्या त्यामध्ये अजून पण सरकारी नोकरी करणारी महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे त्यामध्ये पण जवळपास 50 हजार महिला अजून पण अपात्र होऊ शकतात.
3.काही महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि अजून पण अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे त्यामध्ये पण जवळपास 25 लाख महिला या पुढे चालून अपात्र होऊ शकतात.
4.अजून लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्यांनी निकशाच्या बाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेत आहेत अशा जवळपास 15 लाख महिला या योजनेतून वागण्यात येऊ शकतात आणि त्या महिलांना यापुढील लाभ मिळणार नाही.

अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू असल्यामुळे जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये काही महिला या योजनेचा गलत लाभ घेत आहेत त्यामुळे त्या महिला ह्या निर्देशनास येत असतात. मागील काही महिन्यांमध्ये जवळपास नऊ लाख महिला ह्या अपात्र झाल्या होत्या त्यानंतर काही सरकारी नोकरी असलेल्या महिला ह्या मागील महिन्यामध्ये अपात्र झालेले आहेत आणि ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत त्या महिलांच्या अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन चौकशी केली असत्यात काही महिला अपात्र झालेले आहेत त्यामुळे आता ही अर्जाची पडताळणी प्रक्रिया पुढेही चालू राहणार आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala tr 1pn hafta ala nahi ye
Sir aata paryant mala may paryant che paise aale aahet 1500 june che paise kadhi yetil Thane west pawarnagar