Ladki Bahin Yojana 8th installment update
Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 7 हप्त्याचे वितरण हे नियमितपणे प्रतिमाहिना 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलाच्या बँक खात्यामध्ये दर महिना पंधराशे रुपये जमा करण्यात येतात परंतु फेब्रुवारीचा 1500 रुपये चा हप्ता फेब्रुवारी संपला तरी पण अजून जमा झालेला नाही तर सर्व लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचा हप्त्याकडे लक्ष लागले आहे आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल हे आपण यामध्ये सविस्तरपणे पाहूया.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का आला नाही
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीचा बँक खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने 3500 कोटी रुपये च निधी हा वर्ग केला होता असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याचा कार्यक्रमांमध्ये स्पष्टपणे सांगितले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे फेब्रुवारीच्या हप्ता येण्यास विलंब झालेला आहे आणि दुसरे कारण असे समजले जाते की अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे पण फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झालेला आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा करण्यात आला होता. तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील एकत्रितपणे जमा होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या योजनेचे काही निकष योजना सुरू झाली तेव्हाच लागू केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही अर्जाची छाननी झाली नव्हती म्हणून याचा निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेच्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणून आतापर्यंत 9 लाख महिला योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत तरी अजून छाननी प्रक्रिया सुरूच आहे ही मार्चपर्यंत चालणार आहे.
त्यामुळे या योजनेतून अजून किती महिला अपात्र होतील याकडे लक्ष लागले आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत त्या महिलांना आता योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच ज्या महिलांकडे चारचाकी वहान किंवा त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी आयकर भारत असेल किंवा आधार कार्ड लिंक नसेल अशा महिलांना या योजनेतून आता अपात्र करण्यात येत आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी
लाडक्या बहिणी योजनांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारकडून 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता त्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीनंतर स्पष्टपणे सांगितले होते की अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तरी आता 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामध्ये 2100 रुपयाची ही अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे मार्च महिन्यात 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच फेब्रुवारीचा 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा हप्ता 2100 रुपये असे मिळून 3600 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Liability for this scheme pls share