Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर !! पहा कधी येइल तीसरा हप्ता आणि तारीख

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे आता महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आहे? आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत? हे जाणून घेऊयात.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank accoun
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank accoun

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरु Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra

या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी ४० लाख बहिणींचे अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी अर्ज केले. त्यांना जुलै-ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरु असून अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटींहून अधिक महिला पात्र ठरतील, असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता, तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही.

अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात पाठविले जातील. असं सूत्रांकडून समजतं आहे. दरम्यान, ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठविले जातील तेव्हा ते DBT मार्फ़तच मिळतील.

लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय? Ladki Bahin Yojana Aaadhar Seeding

माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, तर अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे. तसेच डीबीटी देखील त्यांनी इनेबल करून घ्यावे.

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500 1

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता Ladki Bahin Yojana 3rd Installment

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेले नाहीत. त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना थेट 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स कसं तपासावं? Ladki Bahin Yojana Application Status

माझी लाडकी बहीण योजना स्टेट्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती तपासू शकता आणि तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.आंणि नारी शक्ति आप वरुण पण आपले अर्जाची स्तिति तापसु शकता.

Ladki Bahin Yojana form

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment