Ladki Bahin Yojana : आज लाडकी बहीण योजनेच्या दसर्‍या हप्ता वितर्नाचा कार्यक्रम होणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Nagpur CM Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य आयोजन येत्या ३१ ऑगस्ट रोजी येथील रेशीमबाग मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी शहरी, ग्रामीणसह सर्व विभागांना टार्गेट दिले असून ५० हजार महिलांना गोळा करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Nagpur Ladki Bahin Yojana Program | कार्यक्रमाची तयारी जोमात

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणार्‍या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज बुधवारी विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Ladki Bahin Yojana 2nd Installment

आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनानुसार अंमलबजावणीबाबत विविध विभागांकडून माहिती देण्यात आली. मुख्य कार्यक्रमस्थळी उचित व्यवस्था व सुरक्षा, या (CM Ladki Bahin Yojana) कार्यक्रमासाठी येणार्‍या महिला लाभार्थ्यांची आसन व्यवस्था, प्रसार माध्यमांची व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदार्‍या काटेकोर व वेळेत पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेकडे 25,000 महिलांची कार्यक्रमात अनायची जबाबदारी | Municipal corporation

लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) पहिल्या टप्प्यात ५ लाख ५० हजार महिलांनी अर्ज केले आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात ३ लाख ५४ हजार महिलांनी अर्ज केले आहे. त्यांना शनिवारी लाभ दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे १५ हजार, जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपालिका यांच्याकडे १० हजार व महानगरपालिकेकडे २५ हजार महिलांची जबाबदारी दिल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : आज लाडकी बहीण योजनेच्या दसर्‍या हप्ता वितर्नाचा कार्यक्रम होणार”

  1. माझ्या पत्नीचे अजून देखील पैसे आले नाही . सुरवातीला फॉर्म भरला होता नाव जयश्री प्रविण थोरात नेरूळ नवी मुंबई पिन 400706

    Reply

Leave a Comment