Ladki Bahin Yojana e KYC Process News :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना व्यवस्थितपणे आणि सुरळीतपणे लाभ मिळावा यासाठी काही महिन्यापासून ही केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुरुवातीला 2 कोटी 43 लाख एवढी होती त्यानंतर ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर त्या महिलांची संख्या आता केवायसी पात्र महिलांची संख्या आता 1 कोटी 75 लाख एवढी झाली आहे याचा अर्थ असा की अजूनही लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया किंवा त्यांचे अर्जामध्ये चुका आहेत. आता आपण केवायसी बद्दल आणि केवायसी दुरुस्ती बद्दल आणि कोणत्या महिला लाभार्थी आहेत याबद्दल सविस्तरपणे चर्चा करूया.Ladki Bahin Yojana e KYC Process News

सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी निधी वाटप
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मागील वर्षी या योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाडक्या बहिणीच्या हप्ता वितरणासाठी प्रति महिना 3600 कोटी रुपयांचे निधी प्राप्त होत होता त्यानंतर यावर्षी म्हणजे 2026 च्या अर्थसंकल्पात याच योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी आता फक्त 2600 कोटी रुपयांचा निधी वितरित होत असतो.
म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये आता राज्य सरकारला 1200 कोटी रुपयांच्या कमी खर्च लागेल यामध्ये लाखो महिला या लाडकी बहीण योजनेच्या निकषामुळे किंवा केवायसी प्रक्रियेमुळे अपात्र झालेले आहेत. या योजनेचा उद्देश असा आहे की ज्या खरंच पात्र महिला आहेत त्यांनाच लाभ मिळावा आणि ज्या महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये यासाठी केवायसी गरजेची आहे आणि ज्या महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे.

केवायसी पूर्ण पण पैसे आले नाही
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही पण त्यांची केवायसी प्रक्रिया ही अगोदरच पूर्ण असेल तर त्या महिलांनी आता तक्रार पण करून आपल्या समस्याचे विवरण करू शकतात.
त्यासाठी ज्या महिलांच्या हप्ता थांबले आहेत त्या महिलांनी जवळच्या किंवा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपले पूर्ण कागदपत्रे व केवायसी प्रक्रिया पूर्ण केली याची नोंद तिथे जाऊन तक्रार देऊन किंवा आपल्या अर्जाची पुनर पडताळणी करून आपला पुढील लाभ सुरळीत करू शकता. म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहेत की नाही याची पुष्टी होऊन जाईल. म्हणजे तुमचा पुढील लाभ विभागाकडून पुन्हा सुरळीत सुरू केला जाईल.

केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी केवायसी मध्ये चुकीची माहिती दिली होती त्यामुळे अनेक महिलांचे लाभ हे बंद झाले होते.
या योजनेमध्ये महिलांनी पुन्हा एकदा केवायसी करून त्या दुरुस्ती करायची आहे किंवा ज्या महिलांचे केवायसी प्रक्रियेमध्ये प्रश्न चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्याचा लाभ बंद झाला होता त्यांनी आता पुन्हा केवायसी करून त्या दुरुस्ती करायची आहे. जर दुरुस्ती केली असेल तरी तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जर तुमची केवायसी प्रक्रिया किंवा केवायसी दुरुस्ती जर पूर्ण झाली असेल पण लाभ आला नसेल तर तुम्हाला एकत्रितपणे थकीत हप्ते पूर्णपणे मिळतील. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी असेल त्यांना आता दिलासादायक गोष्ट म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून किंवा दुरुस्त करू शकता.

केवायसी का गरजेची आहे
1.या योजनेमध्ये खूप अर्ज हे बनावट असल्यामुळे त्यांना रोख लावण्यासाठी केवायसी गरजेची आहे.
2.या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या वर रोख लावणे.
3.ज्या पाच महिला आहेत त्यांनाच लाभ मिळावा म्हणजेच डीबीटी ऍक्टिव्ह पाहिजे.
4.केवायसी केल्यामुळे लाभार्थी महिलेची पूर्ण माहिती जमा राहते.
5.केवायसी मुळे लाभार्थी महिलेची राज्य सरकारला पूर्णपणे माहिती मिळते आणि त्यांना सोयीस्कर जाते.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.