लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? 3000 की 4500 रुपये मिळणार – मोठी बातमी Ladki Bahin Yojana 17th Installment

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला – 3000 मिळणार की 4500? मोठे अपडेट समोर Ladki Bahin Yojana Installment Date

Ladki Bahin Yojana November Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाते. मात्र आतापर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या दोन्ही महिन्यांचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही.

डिसेंबर महिना संपत आला असतानाही सलग दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महिलांना एकत्रित 3000 रुपये मिळणार की तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडक्या बहिणीला कधी मिळणार नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता? | Ladki Bahin Yojana November Installment Date

Ladki Bahin Yojana November Installment Date

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यातच डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा अद्याप खात्यात आलेला नसल्यामुळे, सरकारकडून दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा होतो. मात्र यावेळी याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही महिलांना 4500 रुपये (तीन महिन्यांचे) मिळणार की फक्त 3000 रुपये (दोन महिन्यांचे) मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारी 2026 पूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता उशिरा का येतोय? |Ladki Bahin Yojana 17th Installment Date Maharashtra

Ladki Bahin Yojana September Payment Date,

लाडकी बहीण योजनेचा हप्ता दरमहा आधार-लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. मात्र मागील दोन महिन्यांपासून विविध निवडणुका, आचारसंहिता आणि प्रशासकीय कारणांमुळे हप्त्याच्या वितरणात विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे अनेक पात्र महिलांना वेळेवर आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.

ई-केवायसीसाठी उरले फक्त काही दिवस |Majhi Ladki Bahin Yojana ekyc ,

माझी लाडकी बहीण योजनेत योग्य आणि पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे.
शासनाने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिली आहे.

यासंदर्भात अदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी न झाल्यास पुढील हप्ते अडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ✔ आधार-बँक लिंक तपासा
  • ✔ ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा
  • ✔ अधिकृत शासन अपडेटवरच विश्वास ठेवा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment