Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता E-KYC करणे झाले सोपे फक्त दोन मिनिटांमध्ये करा E-KYC

Ladki Bahin Yojana E-KYC Easy Process :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची महिलांसाठी सर्वात मोठी योजना ठरली आहे या योजनेमध्ये खूप सारे गैरप्रकार निर्देशनास आले त्यामुळे आता राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमध्ये ई – केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना पारदर्शकरित्या या योजनेचा 1500 रुपयेचा लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनांमध्ये केवायसी करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिति तटकरे यांनी जीआर काढला होता, त्यामध्ये ज्या महिलांची इ केवायसी पूर्ण होईल त्यांना रीतसर आणि सुलभतेने प्रत्येक महिन्याचा लाभ मिळेल परंतु काही दिवस सर्व डाऊन असल्यामुळे ती केवायसी करणे अवघड जात होते परंतु, आता इ केवायसी कशी करायची फक्त दोन मिनिटांमध्ये याबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेऊया.

Ladki Bahin Yojana eKYC link Process 1

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana eKYC Portal ladki bahin ekyc
Ladki Bahin Yojana eKYC Portal

E-KYC करण्याची सोपी प्रक्रिया

ज्या महिलांनी आतापर्यंत इ केवायसी केली नाही त्यांच्यासाठी आता सर्वात सोपी पद्धत आपण जाणून घेऊया खालील पद्धतीने..

सर्वप्रथम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
० त्यानंतर मुख्यपृष्ठावर एक केवायसी हा पर्याय उपलब्ध आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
० त्यानंतर तिथे दिलेली आवश्यक ती माहिती म्हणजेच आधार नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यामध्ये टाकायचा आहे.
० त्यानंतर तिथे कॅपच्या कोड अचूकपणे टाकायचा आहे.
० त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल
० आता तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे.
० आता जी कागदपत्रे तुम्हाला मागितली आहेत अपलोड करण्यासाठी ती कागदपत्रे व्यवस्थित तुम्हाला तिथे अपलोड करायची आहेत आणि ही कागदपत्रे सर्व खरी असणे गरजेचे आहे.
० शेवटचं म्हणजे जी माहिती आपण भरली ती माहिती एकदा व्यवस्थित तपासायची आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
० आता तुम्हाला तुमची केवायसी पूर्णपणे पूर्ण झाली आहे असा मेसेज तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल वरती आला का चेक करा.
० जर तुम्हाला मेसेज नाही आला तर समजा तुमची ही केवायसी या अगोदरच पूर्ण झालेली आहे.

ladki bahin yojana august installment date,

E-KYC करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

  1. ० लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलेचा महिलेचे आधार कार्ड.
  2. ० आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  3. ० ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरतीच जायचे आहे.
  4. ० ई केवायसी करण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या निकषांमध्ये बसणे गरजेचे आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC

इ केवायसी करणे का आवश्यक आहे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून या योजनेमध्ये खूप गैरप्रकार उघडकीस आले आहेत त्यामध्ये काही पुरुषांनी महिलांच्या नावे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारला लुबाडले आहे.
महिला व बाल विकास विभागाने असे खूप सारे प्रकार पाहून यामधील जे निकषाच्या आधारे जवळपास लाखो महिला ज्या अर्ज या लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आली आहे त्यामध्ये ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.

ज्या महिलांचे घरी चार चाकी वाहने आहे किंवा ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान नाहीये अशा निकषाच्या आधारे 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज या योजनेतून वगळण्यात आले आहेत आणि या सर्व महिला लाडकी बहिण योजनेतून बाद झाल्या आहेत त्यामुळे या योजनेमध्ये पारदर्शकपणा यावा आणि ज्या गरजू आणि खरोखरच पात्र असलेल्या महिलांनाच व्यवस्थितपणे प्रत्येकी महिना लाभ मिळावा यासाठी ई केवायसी करणे आता बंधनकारक केले आहे.

Leave a Comment