Ladki Bahin Yojana June Installment 1500 Rupaye Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण योजना बनली आहे या योजनेमध्ये राज्याच्या लाडक्या बहिणींना या योजनेतून प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो या योजनेमध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण आणि स्वावलंबी बनवण्याचा महाराष्ट्र राज्याचा उद्देश आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी महिलेचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण पूर्णपणे झालेले आहे आता पात्र लाडक्या बहिणी या 12 व्या हप्त्याची जून महिन्याचे 1500 रुपये कधी येतील यांच चिंतेत आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहीण योजना जूनचा हप्ता कधी येणार याची घोषणा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता जून महिना संपला तरी पण आलेला नव्हता परंतु 30 तारखेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की 3690 कोटी रुपये निधी हा महिला व बालविकास विभागाकडे स्वीकृत केलेला आहे आणि लवकरच जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केल्यानंतर सर्व महिलांना अपेक्षा लागली होती की जून महिन्याचा हप्ताह 1 जुलैपासून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येइल परंतु अजूनही लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले नाहीत परंतु एक- दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

मे महिन्याचा हप्ता आणि GR
लाडकी बहिण योजनेमध्ये मे महिन्याचा हप्ता हा मे महिना संपल्यानंतर 5 जून पासून येण्यास सुरुवात झाली होती त्याचे कारण असे की मे महिन्याचा निधी हा 3690 कोटी रुपये हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 28 मे रोजी महिला व बाल विकास विभागाकडे स्वीकृत केला होता परंतु या निधीचे वाटप 5 जुलैपासून करण्यात आले होते आणि महिला व बाल विकास विभागाकडे विभागाने GR पण 28 मे रोजी प्रसारित पण केला होता परंतु महिलांचे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी सात दिवसाचा विलंब लागला होता म्हणजेच पाच जून पासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्यास सुरुवात झाली होती.

जून महिन्याचा हप्ता आणि GR
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिला ह्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी वाट पाहत आहेत परंतु जून महिना संपवून जुलै महिन्याची 3 तारीख आहे अजूनही महिलांच्या बँकेमध्ये 1500 रुपये जमा झालेले नाहीयेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 30 जूनला महिला व बाल विकास विभागाकडे 3690 कोटी रुपयांचा जून महिन्याचा निधी हा विभागाकडे पाठवण्यात आला होता परंतु अजूनही जूनचा हप्ता वितरण सुरुवात झालेली नाही. महिला व बाल विकास विभागाने जीआर पण जारी केलेला आहे तरी पण अजून वितरणास सुरुवात होण्यास एक-दोन दिवस लागणार आहेत कारण की मे महिन्यामध्ये पण सारखीच गोष्ट घडली होती त्यानुसार या जून महिन्याचा पण हप्ता येण्यास आता 4-5 जुलैपासून पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये येण्यास सुरुवात होणार.

लाडकी बहीण योजना अर्जाची पडताळणी
लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्यापासून सुरुवात झालेल्या पात्र लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे या योजनेमध्ये जे निकष राज्य शासनाने ठरवले होते त्याच निकषाच्या आधारे सर्व लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे. मागील काही महिन्यांमध्ये ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्या महिलांना या योजनेतील वगळण्यात आले आहे त्यानंतर आता ज्या महिलांचे उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना पण या योजनेतून वगळण्यात आले होते. अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही अजून पण चालूच आहे आता आयकर दाता कोणी अर्जदार महिलेच्या घरी आहे का याची चौकशी चालू आहे त्यामुळे मागील दोन-तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून येण्यास सुरुवात होत आहे किंवा प्रत्येक हप्ता येण्यास विलंब होत आहे.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala pan paise nahi mila Jun ka 12 hafta
Sir ajun paise nahi aalet june che 1500 kadhi yetil Thane west pawarnagar