मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु | पात्रता, कागदपत्र, ऑनलाइन फॉर्म

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra |महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ऑनलाइन अप्लाई

Mukhyamantri Tirth Darshan Yojana :नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ठेवले आहे. या योजनेच्या मुख्य उद्देश राज्यातील सर्व ६० वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना देशातील सर्व धार्मिक स्थळाचे दर्शन घडवायचे. राज्यातील बहुतांश वृद्ध महिला पुरुष नागरिकांनी ज्यांना देशातील अनेक तीर्थस्थळावर पाहण्याची इच्छा आहेत पण आर्थिक स्थिती व कुणी सहारा नसल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. यासाठी शासनाने सभागृहात मध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत या योजनेंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल., याच्यामध्ये या योजनेद्वारे ६० वर्ष वरील सर्व वरिष्ठ नागरिकांना फ्री मध्ये या प्रेक्षणीय दर्शनीय स्थळाची यात्रा केल्या जाईल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही नवी महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठी अर्ज व पात्रता कागदपत्राची संपूर्ण जानकारी शासनाने नवीन शासन आदेश द्वारा दिली आहे, तुम्ही या सर्व शासन निर्णयानुसार माहितीची घेऊन या योजनेसाठी आपण पात्र आहे की नाही याबद्दल सर्व माहिती बघू शकता.

  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  • वय साठ वर्षापेक्षा जास्त असावं
  • परिवाराची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावी
  • या योजनेअंतर्गत सर्व सर्व धर्माचे वृद्ध नागरिक आवेदन करण्यासाठी पात्र असतील.
  • 75 पेक्षा जास्त वय असलेल्या अर्जदाराला त्याच्यासोबत एक सोबती येण्याची अनुमती असेल.
  • अर्जदार हा शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असला पाहिजे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra GR

क्र.मुद्दातपशील
1.योजनेचा उद्देशराज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आर्थिक मदत.
2.समाविष्ट तीर्थक्षेत्रेभारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश.
3.लाभाचा एकदा वापरपात्र व्यक्तीला एक वेळ लाभ घेता येईल.
4.प्रवास खर्चाची मर्यादाप्रती व्यक्ती 30 हजार रुपये, ज्यामध्ये प्रवास, भोजन, निवास इ. समाविष्ट आहे.
5.पात्रता निकष६० वर्षे व त्याहून अधिक वय, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी.
6.वैद्यकीय प्रमाणपत्रसरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करून प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
7.अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राव्दारे भरला जाऊ शकतो.
8.अपात्रता निकषआयकरदाता, सरकारी कर्मचारी, चारचाकी वाहन धारक, संसर्गजन्य रोगाने ग्रस्त व्यक्ती, इ.
9.निवड प्रक्रियाजिल्हास्तरीय समितीद्वारे लॉटरी पद्धतीने निवड.
10.75 वर्षावरील अर्जदारजीवनसाथी किंवा सहाय्यक सोबत नेण्याची परवानगी.
11.नियोजन व नियंत्रणराज्य व जिल्हास्तरीय समिती, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना स्थान लिस्ट

महाराष्ट्र शासनाने सर्व धार्मिक व्यक्तींसाठी ही तीर्थ योजना लागू केली आहे, त्यामध्ये सर्व धार्मिक स्थळाचे महत्त्वपूर्ण स्थळाची यामध्ये निवड केलेली आहे हे धार्मिक स्थळे खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री शीर्ष दर्शन योजनेमध्ये कोण पात्र आहे

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हे सर्व धर्मीय लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली एक धार्मिक योजना यामध्ये २.५० लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे वाले सर्व ६० वर्षावरील वृद्ध नागरिक यामध्ये पात्र आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व वरिष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 30 हजार रुपयांच्या आर्थिक लाभ मिळेल या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना देशातील व महाराष्ट्रातील सर्व मुख्य तीर्थस्थळाची मोफत दर्शन घडविले जाईल.
त्यांच्यासाठी या योजनेंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. त्यांना सरकारकडून मोफत भोजन, राहण्याची व्यवस्था, शुद्ध पाणी, बस सुविधा व खूप सार्‍या सुविधा प्रदान केल्या जातील.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरावे लागेल त्यासाठी आपल्याला संबंधित कागदपत्र तयार करून ती कागदपत्रे महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करावी.

  1. आधार कार्ड
  2. राशन कार्ड
  3. महाराष्ट्रात राहण्याच्या अधिवास प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट साईट फोटो
  5. या योजनेमध्ये नियम व अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र
  6. कुटुंबाच्या व्यक्तिचे मोबाईल नंबर
  7. डॉक्टर प्रमाणपत्र
  8. वयाच्या दाखला

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन येथे साठी अपात्रता

  • अर्जदार परिवारात कोणी सदस्य आयकर भरत असेल तर तुम्ही या तीर्थ दर्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
  • तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी किंवा निम सरकारी कार्यालयामध्ये काम करत असेल.
  • तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी पेन्शन घेत असेल.
  • तुमच्या परिवारात कोणी पूर्व खासदार/आमदार असेल तर तुम्हाला या योजना लाभ मिळणार नाही.
  • तुमच्या परिवारामध्ये कोणाकडे चार चाकी वाहन नावाने असेल.
  • शारीरिक मानसिक रोगाने ग्रस्त किंवा हृदयासंबंधीत रोग, श्वासांना रोग, मानसिक रोग असेल.
  • या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लाय

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे अर्ज करू शकता या तीर्थ दर्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून या तीर्थ दर्शन योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता.

  • सगळ्यात अगोदर तुम्हाला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
  • होमपेजवर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री चे तीर्थ दर्शन योजनेच्या ऑनलाइन फॉर्म दिसेल.
  • तीर्थ दर्शन योजनेच्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायची आहे.
  • सर्व बाबी व्यवस्थित भरली आहे की नाही याची पडताळणी करून तुम्हाला ऑनलाइन फॉर्म सबमिट करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा.
  • अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन युतीसाठी ऑनलाईन अप्लाय रजिस्ट्रेशन करू शकता.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु | पात्रता, कागदपत्र, ऑनलाइन फॉर्म”

Leave a Reply to Kalida manik Acharya Cancel reply