लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी राशन कार्ड मध्ये महिलांचे नाव असणे आवश्यक?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात फार दूरवर सुरू आहे या योजनेबद्दल घोषणा अर्थसंकल्पात होताच सर्व महाराष्ट्रातील महिला या योजनेत सामील होण्यासाठी धडपड करत आहे, त्यामुळे सरकारी कार्यालयात खूप मोठी गर्दी होत आहे आणि चुकीच्या बातम्या पण महिलांमध्ये पसरवल्या जात आहे. त्यामध्ये राशन कार्ड मध्ये ज्या महिलेचे नाव नसेल त्यांना या लाडकी बहीण योजनांची दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार नाहीत याबद्दलही खूप महिलेच्या मनात शंका आहे, या योजनेबद्दल असणाऱ्या या अफवा बद्दल आपणास या पोस्टमध्ये संपूर्ण बरोबर माहिती दिली जाईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रत्येकी महिन्यात देण्यात येणार आहे म्हणजे दरवर्षी पात्र मेलेला वरच्या वर्षा खातीर 18000 रुपये मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील कुमारी, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिलांना या माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ दिला जाणार आहे ज्या महिला परराज्य जन्म झालाय मात्र त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पुरुषासोबत लग्न केले आहे आणि आपल्याच राज्यात वास्तव्याला आहे अशा महिलांना देखील या योजनेच्या लाभ मिळणार आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी राशन कार्ड मध्ये महिलांचे नाव असणे आवश्यक?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 1 जुलैपासून तर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात येणार आहे, या अर्ज अंतर्गत आधार कार्ड डीबीटी लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (‌‌ डीबीटी ) द्वारे महिलांच्या खात्यात मानधन जमा करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी आपल्याला राशन कार्ड या कागदाची गरज भासणार आहे, त्यामुळे महिलांना राशन कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे, शासनाने नुकताच जाहीर केलेल्या परिपत्रकात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राशन कार्ड मध्ये अर्जदार महिलांचे नाव असणे आवश्यक आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात अन्न व पुरवठा विभागाकडे माहेरच्या राशन कार्ड मध्ये नावे कमी करण्याचे व सासरच्या राशन कार्ड मध्ये नावे टाकण्यासाठी महिलांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याच दरम्यान या संदर्भातील आता सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने आता रेशन कार्ड मध्ये ज्या महिलांची नावे कमी करणे आहे किंवा महिलाचे नावे लावण्यासाठी लागणाऱ्या दाखल्याच्या आवश्यक असणारी शासकीय 33 रुपयाची फी माफ करण्यात आलेली आहे, त्यांची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती वर्तमानपत्र व मीडियाला दिलेली आहे.

शिवाय राशन कार्ड मध्ये महिलाचे नाव कमी करणे व नाव लावण्यासाठी लागणारा वेळ कमी करावा वर त्वरित महिलांचे काम करावे असे निर्देश संबंधित मंत्र्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र