महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणे सुरू | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024

Mazi Laadki Bahin Yojana Maharashtra Online App: राज्य शासनाची महत्वकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप मोठी चर्चा सध्या राज्यभरात चालू आहे, गाव खेड्या पासून ते शहरापर्यंत सर्वत्र याच योजनेचे चर्चा केली जात आहे ही योजना सुरू केल्यापासून विरोधक सरकारवर हल्ला चढविला आहे तर सरकार स्वतःची गुणगान गात आहे.
दुसरीकडे या योजनेचे फॉर्म भरण्यात महिलांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे, खूप जणांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहे तर कोणाचे नारी शक्ती दूत ॲप ओपन होत नसल्यामुळे महिलांना या योजनेचे फॉर्म भरण्यात खूप सारे अडचणी निर्माण होत आहे. पण ज्या महिलेचे फॉर्म भरले आहे त्यांना आता या योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति माह 1500 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहे, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला व वार्षिक 18,000 रुपये लाभ मिळणार आहे.

कधी होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा | Mazi Ladki Bahin Yojana Payment

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या प्रमाणे माझी लाडकी बहीण योजना चे पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार अशी माहिती शासनाने दिलेली आहे, तरी पण याबद्दल अधिकृत माहिती आतापर्यंत जाहीर केलेली नाही आहे.

या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणे सुरू

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रति महिना महिलांना दिला जाणार आहे, तर काही महिलांना खात्यामध्ये सरकारने 1 रुपया जमा केलेला आहे असा प्रश्न विचारल्यास त्यांनी सांगितले की काही पात्र महिलांना खात्यात पैसा जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करून प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा केला जात आहे, हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीच्या भाग आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment