Ladki Bahin Yojana Jully Installment 1500 Rupaye Update
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील गरीब व गरजू महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना मध्यप्रदेशच्या लाडली बहिण योजनेच्या आधारे सुरू करण्यात आली होती या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली होती.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयेची आर्थिक मदत दिली जाते या योजनेमध्ये आतापर्यंत 12 महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 18000 रुपये पात्र महिलांच्या बँकांचा जमा झालेले आहेत. या योजनेमध्ये अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असावे लागते आणि काही निकष ठरवले त्यामध्ये पात्र असावे लागते. या योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत त्यांना योजनेतून वागळन्यात येत आहे आता सर्व पात्र महिलांना आशा लागली आहे ती जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin.maharashtra.gov.in login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

लाडकी बहिण योजनेचा गैरवापर
० अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
० सरकारी कर्मचारी महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
० एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी पण लाभ घेतल्याचे प्रकरण दिसून आले.
० ज्या महिलांचे वय 65 वर्ष च्या अधिक झाले त्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
० राज्यातील 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाडकी बहीण म्हणून गैरफायदा घेतल्याचे प्रकरण दिसून आले.
हे सर्व प्रकरण काही महिन्यांमध्ये राज्याच्या निर्देशनास आले आहे त्यामुळे अशा सर्व अपात्र लाभार्थ्याचे नाव या योजनेतून वगळण्यात आले आहेत आणि ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा निधी घेतला आहे त्या सर्वांकडून पैसे वसूल करणार अशी घोषणा अजित पवार यांनी दिलेली आहे.

लाडकी बहिण योजना – अदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये काल मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमाचे बोलताना सांगितले की काही लाभार्थी महिलांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला असल्याचे आणि काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा अर्ज केल्याच्या गैरप्रकार घडला आहे या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26 लाख 34 हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2 कोटी 25 लाख पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे.
आता उर्वरित ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी अपात्र महिलांची लिस्ट पूर्णपणे या योजनेतून वगळण्यात येईल त्यानंतरच पुढील हप्ता मिळेल.
जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप जास्त गैरप्रकार घडले आहेत त्यामुळे राज्य सरकारला या योजनेमुळे फटका बसला आहे. या योजनेमध्ये काही निकष सुरुवातीपासून ठरवले होते त्यांनी निकषांच्या बाहेर जाऊन काही महिलांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये जवळपास आतापर्यंत 35 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत या सर्व महिला लाडकी बहिणी योजनेचे आणि निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या. आता ज्या महिला पात्र असतील आणि लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये योग्यरीत्या बसत असतील त्यांनाच या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
June cha hapta ajun ala nahi tya haptyach ky vishaych nahi kahi mahilanna milala nahi june hapta please lavkarat lavkar dya
नाही आले खात्यात जमा कधी होणार