लाडकी बहीण जून हफ्ता आला नाही, या 7 कारणांमुळे Ladki Bahin Yojana Hafta Ala Nahi

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Hafta ala nahi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता न मिळण्यामागची ७ प्रमुख कारणे


Ladki Bahin Yojana June Installment- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा होतात. जून महिन्याचा १२वा हप्ता शासनाने जाहीर केला असून बहुसंख्य लाभार्थी महिलांच्या खात्यात तो जमा झाला आहे. तरीही अनेक महिलांना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या मनात चिंता वाढली आहे. जून महिन्याचा हप्ता न मिळण्यामागे ७ प्रमुख कारणे आहेत, जी आपण सविस्तरपणे पाहूया. ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेचा 12वा हफ्ता जमा | Ladki Bahin Yojana June Hafta Release


जून महिन्याच्या १२व्या हप्त्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास मंत्रालयाला ४०० कोटींहून अधिक निधी हस्तांतरित केला आहे. त्यामुळे योजनेत पात्र असलेल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना जून महिन्याचा १२वा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, खूप कमी महिलांना हा हप्ता मिळाला आहे आणि बहुसंख्य महिलांच्या खात्यात तो जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक महिलांना ‘जून महिन्याचा हप्ता का आला नाही?’ असा प्रश्न पडला आहे.ladki Bahin Yojana Hafta ala nahi


जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता न मिळण्याची ७ प्रमुख कारणे | Ladki Bahin Yojana Installment Not Received


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी ३० जून २०२४ रोजी सुरू झाली. या योजनेसाठी राज्य शासनाने काही निकष निश्चित केले होते. ज्या महिलांनी या निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, अशा महिलांचे अर्ज तपासले जाऊन त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. खालील ७ प्रमुख कारणांमुळे अनेक महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि त्यांना १५०० रुपयांच्या मासिक मानधनापासून वंचित राहावे लागत आहे: Ladki Bahin Yojana Hafta Update


१. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त: ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळत नाही.
२. कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे: ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर (Income Tax) भरतो, ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरते. करदात्या कुटुंबांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळत नाही.
३. सरकारी नोकरीत असलेले कुटुंब सदस्य: कुटुंबातील सदस्य राज्य सरकार, केंद्र सरकार, किंवा कोणत्याही उपमंडळात (Sub-Corporation) कार्यरत असल्यास, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
४. इतर योजनांतून ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन: जर संबंधित महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल, तर त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. दुहेरी लाभा टाळण्यासाठी हा निकष लावण्यात आला आहे.
५. आमदार/खासदार असलेले कुटुंब सदस्य: सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार (MLA) किंवा खासदार (MP) असल्यास, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
६. बोर्ड/कॉर्पोरेशन/मंडळाचे सदस्य: ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड, कॉर्पोरेशन, महामंडळ (Corporation), किंवा उपमंडळाचे सदस्य आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
७. चारचाकी वाहन कुटुंबाच्या नावावर (ट्रॅक्टर वगळून): ट्रॅक्टर वगळता, ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन (उदा. कार, जीप) आहे, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात. हे उत्पन्न आणि आर्थिक सक्षमता दर्शवते.
वरील कारणांमुळे अनेक पात्र महिलांनाही त्यांचा हप्ता मिळाला नसावा. ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपल्या पात्रतेची एकदा पुन्हा पडताळणी करावी आणि वरील निकषांमध्ये बसत नसल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.


टीप: तुमच्या खात्यात हप्ता जमा न होण्याचे कारण वरीलपैकी एक असू शकते. याबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या पात्रतेची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

37 thoughts on “लाडकी बहीण जून हफ्ता आला नाही, या 7 कारणांमुळे Ladki Bahin Yojana Hafta Ala Nahi”

  1. सर माझ्या आई चे पैसे डिसेंबर पासून येत नाहीत आम्ही या ७ अटी पैकी कशातच बसत नाही तरी सुद्धा तिला पैसे नाही भेटले अस का ….?आम्ही middle class फैमिली आहे सर.. अंगणवाडी मधे सांगितले ते बोलतात बँक मधे जावा तिथे गेले की बोलतात ज्यांनी फ्रॉम भरला आहे तिथे जावा इकडे तिकडे नुस्त फिरायच का …?

    Reply
  2. Lata Rajendra Ghadge
    पत्ता :दह्यारी , तालुका : पलुस , जिल्हा: सांगली . डिसेंबर पासून पैसे आले नाहीत अजून . गरजू लोकांना पैसे भेटत नाहीत … ?

    Reply
  3. Lata Rajendra Ghadage
    पत्ता: दह्यारी , तालुका: पलुस, जिल्हा :सांगली .
    डिसेंबर पासून पैसे जमा झाले नाहीत. अंगणवाडी सेविका ना सांगितले ते बोलतात बँके त जावा तिथे बोलतात ज्यांनी फ्रॉम भरला आहे तिथे जावा आम्ही ..करू तरी काय.?

    Reply
  4. June che paise ale ch nahi 7 reason madhun konta cha reason madhye bast nahi tari pan paise alech nahi..

    Reply
  5. Jiske pas 4 wheeler hai,usko Paisa aaya hai,unlogo ke liye ye 7 rule lagu hota hai ki nahi,aur humlogo ke pas kuch bhi nahi hai, two wheeler bhi nahi hai,unko Paisa nahi aaya,sarkar ke dimag me hi khot hai, voting time jawab milega…
    Jay hind
    Jay Maharashtra

    Reply
    • Aamhala pn jun mahinyacha pise aale nahi aamchya gharat kamavnara koni purush nahi koni gavarment madhe nahi tari aamche pise aale nahi jyancha gharat gavrmet sarvar aahe gharat karta purush aahe tyana pise aale as

      Reply

Leave a Comment