Ladki Bahin Yojana: e-KYC कसे करायचे? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana: e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना, या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन दिले जाते.लाडक्या बहिणी योग्य संबंधात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे.

लाडकी बहिण योजनेत आता सर्व पात्र लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे यासाठी शासनाने शासननिर्णय जाहीर केलेला आहे तर बघूया लाडकी बहीण योजनेत केवायसी कशी करायची या कधी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती.


लाडकी बहीण योजनेत e-KYC का आवश्यक आहे?

सक्तीचे आणि पारदर्शक: योजनेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने e-KYC सक्तीचे केले आहे.

पुढील लाभांसाठी उपयुक्त: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार, ही प्रक्रिया भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.


Ladki Bahin Yojana e-KYC न केल्यास काय होईल?

जर तुम्ही वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला मिळणारे ₹1500 मानधन रोखले जाईल आणि तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल. यामुळे वेळेत e-KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


शासन निर्णयात (GR) काय म्हटले आहे?

महिला व बाल विकास विभागाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, e-KYC संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

योजनेचे नाव: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना.

उद्देश: राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी.

प्रक्रिया: या योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) द्वारे केले जाईल.

आधार प्रमाणीकरण: e-KYC प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) वापरणे बंधनकारक आहे.

वेब पोर्टल: या योजनेसाठी खास तयार करण्यात आलेले वेब पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in आहे, जिथे e-KYC ची सुविधा उपलब्ध आहे.

अंतिम मुदत: या शासन परिपत्रकाच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे असे करणार नाहीत, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पात्र मानले जाणार नाही.

वार्षिक प्रक्रिया: या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील.


Ladki Bahin Yojana e-KYC कसे करायचे?

202509181610134730 4 page 0001

ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्हाला फक्त खालील पायऱ्या फॉलो करायच्या आहेत:

वेबसाइटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

बॅनरवर क्लिक करा: मुख्यपृष्ठावरील eKYC Banner वर क्लिक करा.

माहिती भरा: e-KYC फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक, पडताळणी कोड (Captcha) आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन Send OTP बटणावर क्लिक करा.

OTP सबमिट करा: तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) योग्य ठिकाणी टाकून Submit बटण क्लिक करा.

अंतिम सबमिशन: सर्व माहिती भरल्यानंतर, चेक बॉक्सवर क्लिक करून Submit बटणावर क्लिक करा.

प्रक्रिया पूर्ण: तुमची e-KYC पडताळणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला “Success तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

लाडकी बहीण योग्य केवायसी नाही केलं तर काय होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या तुम्हाला मिळणारा लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये सन्मान निधी शासनातर्फे रोखला जाईल व तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार.

काय म्हणाल्या मंत्री अदिती ताई तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.

ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment