Ladki Bahin Yojana August Installment Date Update
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना: १४ वा हप्ता कधी जमा होणार?
Ladki Bahin Yojana August Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या हप्ता कडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ऑगस्ट महिन्याच्या 14वा हप्ताचे 1500 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे आता ऑगस्ट मध्ये संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे तरी पण आतापर्यंत ऑगस्ट महिन्याच्या 14 हप्ता लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खाते जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्याच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आता याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. ladki bahin yojana next installment date
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडक्या बहिणीला 14 वा हप्ता कधी मिळणार

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला रु. १५००/- सन्मान निधी दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे १३ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याचा १४ वा हप्ता कधी मिळेल, याविषयी लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.ladki bahin yojana next installment date
त्यामुळे, जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.
काही महिलांना मिळणार ३००० रुपयांचा हप्ता!

काही तांत्रिक अडचणींमुळे आणि अर्जांची पडताळणी सुरू असल्यामुळे काही महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.जुलै महिन्याचा हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना ऑगस्ट आणि जुलै महिन्यांचा एकूण रु. ३०००/- चा एकत्रित हप्ता दिला जाईल.
तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे कसे तपासावे?
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत:
- बँकेच्या अधिकृत ॲपवर तपासणी: तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपमध्ये लॉग इन करून ट्रान्झॅक्शन लिस्ट तपासू शकता.
- एसएमएस अलर्ट: पैसे जमा झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस येईल.
- बँकेला भेट: तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किंवा एटीएममध्ये जाऊन तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता.
- योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तपासणी: तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमच्या अर्जाची स्थिती आणि हप्त्याची माहिती तपासू शकता.
बोगस लाडकीचा सुळसुळाट 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारने कडक पाऊल उचलले आहे. योजनेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अपात्र लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सूक्ष्म छाननी सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने या लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती जिल्हा यंत्रणेला दिली आहे.छाननी पूर्ण झाल्यावर त्यांची पात्रता स्पष्ट होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
Ladki Bahin Yojana ऑगस्ट पैसे कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 14वा हप्ता 30 ऑगस्ट पासून मिळण्यास सुरुवात होणार.
लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट महिन्यात किती रुपये हप्ता मिळणार?
लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Parbhani ka kese check Karen sir
How to check Ahmednagar list
How to check Ahmednagar list.
Jisko zarurat h usko nh mil raha h or jisko zarurat nh us k ghar me 4 logo ko mil raha h. Jab aise he karna tha to shuru he q kiye the paise Dena.
Maje jun pasun hapte aale nahit tar kashe yetil aani kay karav lagel tyasathi
Meri waife ki DBT link nhi thi to paisa nhi aaya tha link hone ke bad sirf 3000 ropiya aaya hai baqi ka kab aayenga paisa jo pichla baqi h